शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

१८३ कोटींचे वाटप बाकी

By admin | Updated: August 20, 2016 00:55 IST

शिरीष शिंदे , बीड सन २०१५-१६ या वर्षी शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा मंजूर होऊन जिल्ह्याला मिळाला; मात्र दोन महिने उलटूनही प्रमुख चार बँकांमार्फत पीक विम्याचे

शिरीष शिंदे , बीडसन २०१५-१६ या वर्षी शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा मंजूर होऊन जिल्ह्याला मिळाला; मात्र दोन महिने उलटूनही प्रमुख चार बँकांमार्फत पीक विम्याचे १८३ कोटी ७० लाख रुपये वाटप होणे बाकी असल्याची बाब ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. आतापर्यंत ७०८ कोटी ८१ लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. गतवर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला होता. अत्यल्प पावसात पीक पेरणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक हाती येईल की नाही, याबद्दल साशंकता होती. त्यामुळे अनेकांनी प्राधान्याने पीक विमा भरला होता. नॅशनल अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स या शासनाच्या अधीन असलेल्या कंपनीने शेतकऱ्यांचा पीक विमा विविध बँकांतून भरून घेतला होता. जिल्ह्यातील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच पीक विमा मंजूर करण्यात आला होता.जिल्ह्यातील ११ लाख ४७ हजार ७०० शेतकऱ्यांना तब्बल ८९२ कोटी ९७ लाख ९४ हजार एवढा मोठा पीक विमा मंजूर झाला होता. परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या तुलनेत बीडचा पीक विमा सर्वांत जास्त होता. एरवी पीक विमा मंजूर होईल की नाही, अशी शक्यता असते; मात्र दुष्काळाच्या अनुषंगाने पीक विमा मंजूर केला गेला.जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सर्वाधिक पीक विमा भरला गेला होता. त्यापाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्यापाठोपाठ एसबीआय. एसबीएचच्या शाखांमध्ये पीक विमा भरला गेला होता. मात्र, डीसीसी बँकेमार्फत पीक विमा रक्कम वाटप होणे बाकी आहे. वंचित शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने बँकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.