शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्याने उडविली सगळ्यांचीच झोप

By admin | Updated: September 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : बसपाचे तिकीट नाकारल्यामुळे खवळलेल्या एका इच्छुक उमेदवाराने आपल्या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी केलेल्या खोडसाळपणामुळे बसपा नेते, कार्यकर्त्यांबरोबरच यंत्रणेची झोप उडवून टाकली.

औरंगाबाद : बसपाचे तिकीट नाकारल्यामुळे खवळलेल्या एका इच्छुक उमेदवाराने आपल्या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी केलेल्या खोडसाळपणामुळे बसपा नेते, कार्यकर्त्यांबरोबरच पोलीस आणि महसूल यंत्रणेची झोप उडवून टाकली. हॉटेलमध्ये बसपाचे नेते पैसे वाटप करीत असल्याचा खोटा फोन करून त्याने पोलीस, निवडणूक विभागाची अख्खी यंत्रणा कामाला लावली. या फोननंतर तब्बल सहा तास जागून पोलीस आणि निवडणूक विभागाने केलेल्या कारवाईनंतर हा निव्वळ खोडसाळपणाच असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे झाले असे की, बसपाचे राज्याचे प्रभारी खा. वीरसिंह व इतर नेते मंडळी मंगळवारी मराठवाड्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी औरंगाबादेत आली होती. जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये त्यांनी उमेदवार निवडीची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या नेत्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. जालना जिल्ह्यातील एका मतदारसंघातून बसपातर्फे उमेदवारी मिळावी म्हणून औरंगाबादेतील एक कार्यकर्ता इच्छुक होता. सर्व प्रयत्न केले; परंतु पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अंतिम उमेदवार यादीत या कार्यकर्त्याचे नावच आले नाही. आपला पत्ता कट झाल्याचे समजताच हा कार्यकर्ता खवळला. पैसे घेऊन तुम्ही तिकिटे वाटल्याचा आरोप करीत या कार्यकर्त्याने काही काळ हॉटेलमध्ये गोंधळ घातला. त्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास या कार्यकर्त्याने पोलीस नियंत्रण कक्षास फोन केला आणि ‘हॉटेलमध्ये बसपाचे काही नेते उमेदवारांना पैशांचे वाटप करीत आहेत. त्यांच्याकडे एक कोटीच्या आसपास रक्कम आहे’. नियंत्रण कक्षाने ही माहिती तात्काळ सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याला कळविली आणि तातडीने ‘त्या’ हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. सहा तास चालली कारवाईमाहिती मिळताच सिडको एमआयडीसीच्या निरीक्षक निर्मला परदेशी या आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने हॉटेलवर पोहोचल्या. बसपाचे नेते ज्या खोलीत थांबलेले होते, त्या तिन्ही खोल्यांचा पोलिसांनी ताबा घेतला. वास्तविक पाहता निवडणुकीच्या काळात पैसे वाटप करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी ही निवडणूक विभागाने नियुक्त केलेल्या भरारी पथकाची आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक परदेशी यांनी या पथकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे एकाही अधिकाऱ्याने फोन उचलला नाही. शेवटी पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईसाठी पथक पाठविण्यास सांगितले. तेव्हा रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास निवडणूक विभागाच्या पथकातील एक अधिकारी तेथे पोहोचले. त्यानंतर झडतीच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली.