शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ३ नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:40 IST

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित केले जाणारे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. संमेलनाध्यक्षपदी प्राचार्या बीबी फातिमा बालेखां मुजावर, तर रामशेठ ठाकूर स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. इक्बाल मिन्ने यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.‘यंदा हे संमेलनाचे ११ वे वर्ष असून, तीन दिवस रसिकांना विविध साहित्य कार्यक्रमांची रेलचेल अनुभवयाची संधी मिळणार आहे. हे संमेलन केवळ मुस्लिमांचे नसून सर्वांचेच आहे, असे ते म्हणाले. राज्यभरातून व राज्याबाहेरून सुमारे एक हजार साहित्यिक व आठ ते दहा हजार रसिक हजेरी लावतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी संमेलनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी अन्न, नागरी पुरवठामंत्री गिरीश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात मुस्लिम कवयित्री संमेलन, कविसंमेलन, मिलाजुला मुशायरा, विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे, मंडळाचे अधिवेशन व सर्वसाधारण सभा असे कार्यक्रम होणार आहेत.साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संमेलनाचा ५ नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे. यावेळी मुस्लिम मराठी नवसाहित्यिकांचा सन्मान केला जाणार आहे. ‘मंडळाला संमेलनासाठी शासनातर्फे कोणतेही अनुदान वा आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे गेल्या २५ वर्षांत केवळ दहाच संमेलने घेऊ शकलो’, अशी खंत यावेळी डॉ. मिन्ने यांनी व्यक्त केली. पत्रपरिषदेत लियाकत अली पटेल, आरेफ शेख, शमीम सौदागर, अन्वर जावेद शेख आदी उपस्थित होते.