शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी टँकरच्या पाण्यात क्षारच क्षार !

By admin | Updated: April 22, 2016 00:33 IST

सितम सोनवणे , लातूर लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक शहरातील तसेच शहराबाहेरील बोअर व खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत आहेत.

सितम सोनवणे , लातूरलातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक शहरातील तसेच शहराबाहेरील बोअर व खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत आहेत. या पाण्यात क्षारचे प्रमाण ५०० पीपीएम पेक्षा जास्त असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये आढळून आले आहे. ३८ पैकी १२ नमुन्यांमध्ये क्षारचे प्रमाण ५०० पेक्षा अधिक आहे. तर ३८ पैकी २० इतक्या नमुन्यांमध्ये २०० पीपीएम पेक्षा अधिक क्षारचे प्रमाण आहे. सातत्याने असे क्षारयुक्त पाणी पिणे आरोग्यास अपायकारक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. पाण्यामध्ये मानकानुसार क्षार असावेत. ५०० पेक्षा कमी क्षार पाण्यामध्ये असणे आवश्यक असते, असेही आरोग्य संघटनेचे शिवाय, लातूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील विविध जलस्त्रोत तसेच परजिल्ह्यातील व शहरातील विंधन विहिरी, विहिरींच्या माध्यमातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परजिल्ह्यातून आलेले पाणी शहरातील सर्व लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड असून, नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी खाजगी टँकर अथवा मोफत पाणी वाटप टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. हे टँकरचालक शहरातील व शहराबाहेरील विंधन विहिरी, विहिरी व इतर जलस्त्रोतांतून पाणी संकलित करून नागरिकांना पुरवठा करीत आहे. या पाण्यात क्षारचे प्रमाण किती प्रमाणात आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत चमू’ने बुधवारी व गुरुवारी सलग दोन दिवस शहरातील विवेकानंद चौक परिसर, इंदिरा नगर, नाथ नगर, आनंद नगर, हरिभाऊ नगर, साळे गल्ली, गवळी गल्ली, सावेवाडी, खाडगाव रोड, कपिल नगर, सद्गुरु नगर, औसा रोड परिसरातील विंधन विहिरी व टँकरद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची टीडीएस मीटरच्या सहाय्याने (क्षार तपासणी मीटर) तपासणी केली असता जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार १०० ते ३०० पीपीएम हे पाणी नागरिकांना पिण्यास योग्य असते. तसेच ३०० ते ५०० पीपीएमचे पाणी पिण्यास उपयुक्त ठरते. तर ५०० पीपीएमच्या पुढील पाणी हे आरोग्यास अपायकारक ठरत असते, अशी माहिती रसायनशास्त्र विश्लेषक संजय नखाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.क्षारयुक्त पाणी म्हणजे हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम, सोडियम, सल्फेट, लेड, फ्लोराईड, निकेल आदी घटक असतात. पाण्यातील जास्त कॅल्शियममुळे मूतखडा, जास्त सोडियममुळे उच्च रक्तदाब, जास्त सल्फेटमुळे अपचन, लेडमुळे लहान मुलांमध्ये शारीरिक विकास खुंटणे आणि फ्लोराईडमुळे हाडांचे विकार होतात. तर निकेलमुळे किडनीचे विकार उद्भवतात. पाण्यातील हे सर्व घटक संतुलित करणे आवश्यक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार ५०० पीपीएमच्या पुढचे पाणी पिणे म्हणजे वरील आजार ओढवून घेणे होय, असे शहरातील प्रसिद्ध मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. हंसराज बाहेती म्हणाले. वॉटरमधील हार्डनेसपणा कमी केलाच पाहिजे. पाण्यात जास्त क्षार असेल तर किडनीत गाळ तयार होतो. त्याचे खड्यात रुपांतर होऊन मूतखडा होतो. गाळामुळे किडनी मार्गावर जखमाही होतात. इन्फेक्शनही होते. विशेष करून बोअरच्या पाण्यामध्ये असे घटक जास्त असतात. त्यामुळे पाण्यातील प्रस्तुत घटक प्रमाणानुसार करणे आवश्यक असल्याचे डॉ. हंसराज बाहेती यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने टँकरनेच पाणीपुरवठा होतो. परंतु, मनपाकडून जलशुद्धीकरण करून पाण्याचे वितरण केले जाते. त्यामुळे या पाण्यातील टीडीएसचे प्रमाण घटविण्यात आले आहे. हार्ड वॉटरला सॉफ्ट वॉटर करण्यात आले असून, या पाण्यातील क्षारचे प्रमाण २०० पीपीएमपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे मिनरल वॉटरमध्ये क्षार ३५ ते ४० पीपीएम असतात. या तोडीचे पाणी मनपाकडून वाटप केले जात आहे. मनपामार्फत पाणी वाटप होणारे नऊ नमुने तपासले असता क्षारचे प्रमाण १५५ ते १६५ पीपीएम होते. काही नमुन्यांत तर यापेक्षा कमी प्रमाण निघाले. विवेकानंद चौक, सरस्वती कॉलनी येथील जलकुंभातील पाण्याची तपासणी केली असता यातील क्षारही प्रमाणित होते.