शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट

By admin | Updated: July 30, 2014 01:02 IST

नांदेड :सोमवारपासून सुरु झालेल्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अलर्ट घोषित करण्यात आला आहे़

नांदेड :सोमवारपासून सुरु झालेल्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अलर्ट घोषित करण्यात आला आहे़ या सप्ताहात नक्षल्यांकडून पोलिसांवरील हल्ले आणखी तीव्र करण्यात येतात़ त्यामुळे सीमावर्ती भागात अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे़पोलिस दलांकडून झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी नक्षलवादी शोक सप्ताह पाळतात़ या काळात पोलिसांवर हल्ले करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शस्त्रे लुटणे आदींच्या माध्यमातून मरण पावलेल्या नक्षल्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न केला जातो़ सध्या जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षल्यांचा मुकाबला करण्यासाठी सी-४७ ही विशेष तुकडी तैनात करण्यात आली आहे़ या तुकडीला शस्त्रे व इतर साहित्य ही सर्व स्वतंत्रपणे असतात़ या काळात पोलिस ठाण्यांवर हल्ला करुन शस्त्रे लुटण्याची शक्यता असल्यामुळे ठाण्यांमध्ये शस्त्र व दारुगोळा ठेवला जात नाही़ त्याचबरोबर पोलिसांकडून गस्तही वाढविण्यात येते़ गेल्या काही वर्षांत सीमावर्ती असलेल्या किनवट, माहूर तालुक्यात नक्षल्यांनी कुठेही घातपात किंवा हल्ला केला नाही़ परंतु शेजारील तेलंगणामध्ये कोम्बिंग आॅपरेशन सुरु असल्यास मात्र आश्रयासाठी ते या ठिकाणी येतात़ तर नांदेड जिल्ह्यात कोम्बिग आॅपरेशन सुरु झाल्यानंतर ते परत तेलंगणात आश्रय घेतात अशी माहिती आहे़ सोमवारपासून सुरु झालेल्या या सप्ताहानिमित्त पोलिस दल मात्र अलर्ट झाले आहे़ दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शेजारील तेलंगणातून किनवट व माहूर तालुक्यात येणाऱ्या सर्व मार्गावर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे़ नक्षली जंगल मार्गानेच जास्त ये-जा करीत असल्यामुळे त्यासाठी विशेष गस्ती पथकेही तयार करण्यात आली असून ही पथके जंगल पिंजून काढत आहेत़ त्याचबरोबर या काळात पोलिसांकडून कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येत असून ग्रामस्थांनाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो़ (प्रतिनिधी)