शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

महापौरांनी बंद पाडले दारुचे दुकान

By admin | Updated: July 11, 2017 00:06 IST

परभणी : येथील देशमुख हॉटेल कारेगाव भागात सुरू केलेले दारुचे दुकान सोमवारी महापौर मीनाताई वरपूडकर यांनी स्वत: दारु दुकानांवर जाऊन बंद केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील देशमुख हॉटेल कारेगाव भागात सुरू केलेले दारुचे दुकान सोमवारी महापौर मीनाताई वरपूडकर यांनी स्वत: दारु दुकानांवर जाऊन बंद केले़ या कारवाईमुळे दारु दुकानदारांची चांगलीच गोची झाली आहे़ राष्ट्रीय महामार्गावरील दारु विक्रीचे परवाने बंद झाल्यानंतर ही दुकाने शहरातील वसाहतींमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे़ यातूनच सुपरमार्केट ते देशमुख हॉटेल या रस्त्यावर वनविभाग आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या समोर दारु विक्रीचे दुकान नागरिकांना गाफिल ठेवून सुरू करण्यात आले़ या भागात अनेक शासकीय कार्यालये, नागरी वसाहत, मुलींची शाळा, खाजगी शिकवण्या असल्याने दारु दुकानांचा त्रास महिला, विद्यार्थिनी व नागरिकांना होण्याची शक्यता निर्माण झाली होती़ या पार्श्वभूमीवर १० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महापौर मीनाताई वरपूडकर यांच्यासह या भागातील गणेश टाक, सचिन जवंजाळ, राहुल साळवे, चेतन सरकटे, बालासाहेब तरोटे, अक्षय देशमुख आदींनी थेट दारुचे दुकान गाठले़ यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर यांनी दारु दुकानदारास चांगलेच खडसावले़ उद्या जर दुकान सुरू राहिले आणि दुकानाची तोडफोड झाली तर त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे सांगून दुकानाचे शटर ओढून घेतले़ त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून दुकानाचा परवाना रद्द करण्याच्या सूचना दिल्या़ तसेच महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनाही या संदर्भातील अहवाल तयार करण्याच्या सूचना वरपूडकर यांनी दिल्या़