शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दारुचा काळाबाजार; मद्यपि परेशान, महिलांनी केले दारुबंदीचे स्वागत

By admin | Updated: April 4, 2017 23:12 IST

लातूर : महामार्गालगत ५०० मीटर अंतरावर असलेल्या २१० पैकी २०५ दारूची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे काही चालू असलेल्या परमिट रुममधून दारूचा काळाबाजार होत आहे.

लातूर : लातूर शहरात राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटर अंतरावर असलेल्या २१० पैकी २०५ दारूची दुकाने न्यायालयाच्या आदेशाने बंद झाली आहेत. त्यामुळे काही चालू असलेल्या परमिट रुममधून दारूचा काळाबाजार होत आहे. चढ्या दराने दारू विकली जात आहे. यामुळे मद्यपि परेशान झाले असून, गृहिणी मात्र न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. कायमस्वरुपी दारू दुकाने बंद करावीत, अशा प्रतिक्रिया महिला वर्गातून उमटल्या आहेत.लातूर शहरात पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे मद्यपिंना सध्या दारू मिळणे कठीण झाले आहे. जे चार-दोन दुकाने चालू आहेत, त्या दुकानांतून चढ्या दराने दारूची विक्री केली जात आहे. एका ब्रँडची किंमत १५० रुपये असेल तर ती ३५० रुपयांना विकली जात आहे. यामुळे मद्यपिंच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. लातूर शहरातील सुभाष चौकातील एक वाईन शॉप तांत्रिक मुद्दे उपस्थित करून मंगळवारी उघडण्यात आले. तेव्हा मद्यपिंनी दारू खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.