शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात ‘भानदास एकनाथ’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:05 IST

‘भानदास एकनाथ’, ‘एकनाथ महाराज की जय’ असा गजर करीत बुधवारी सकाळी एकनाथ महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी थांबलेल्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

ठळक मुद्देनाथषष्ठीनिमित्त जागोजागी भाविकांनी पालखीचे मनोभावे घेतले दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘भानदास एकनाथ’, ‘एकनाथ महाराज की जय’ असा गजर करीत बुधवारी सकाळी एकनाथ महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी थांबलेल्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. शहरातील वातावरण भक्तिमय झालेहोते.नाथषष्ठीनिमित्त औरंगपुºयातील नाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविक जमा होऊ लागले होते. काकड आरती व भजन झाल्यानंतर सजविलेल्या पालखीत नाथ महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या. ‘एकनाथ महाराज की जय’ असा जयघोष करीत सकाळी ७ वा. मंदिरातून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. रथात हभप अ‍ॅड. गंगाधर घुगे महाराज विराजमान झाले होते. हभप कृष्णा आरगडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली विविध भजनी मंडळे भजन म्हणत पुढे सरकत होते. महिला भाविकांनी फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा केला. भजन म्हणत असताना ‘भानदास एकनाथ’चा गजर केला जात होता. पालखी मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. जागोजागी पालखीला थांबवून भाविक दर्शन घेत होते. आदर्श महिला भजनी मंडळ, सरस्वती महिला मंडळ, शिवपार्वती महिला मंडळ, शारदा महिला मंडळ, दुर्गामाता महिला मंडळ, साई महिला मंडळ, गुरुकृपा महिला मंडळ, माऊली महिला मंडळ, हरिओम महिला भजनी मंडळातील महिला सहभागी झाल्या होत्या. कुंभारवाडा येथे मुरलीधर बोंबले यांनी भाविकांना शीतपेयाचे वाटप केले. त्यानंतर मछलीखडक, सिटीचौक, सराफा रोड, शहागंज, राजाबाजार संस्थान गणपती, किराणा चावडी, पानदरिबा, सुपारी मारुती मंदिर, गुलमंडीमार्गे ११ वाजता पालखी नाथ मंदिरात पोहोचली. यानंतर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सदानंद देवे यांच्या हस्ते अभिषेक महापूजा करण्यात आली. यावेळी ३१ ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चार केला. महापूजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी महाप्रसाद घेतला. नाथषष्ठी उत्सव यशस्वीतेसाठी रवींद्रकुमार बडे, लक्ष्मणराव थोरात, विष्णू जाधव, दिनकर कोरान्ने, गणेश घुगे, सचिन वाळके, रायभान पाटील सतीश म्हस्के, सोमनाथ शेलार आदी परिश्रम घेत आहेत.काल्याचे कीर्तन उद्याशुक्रवारी (दि.९) दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान नाथमंदिरात हभप पद्माकर देशमुख महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात येईल. नाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर सर्व भाविकांना काल्याचे वाटप करण्यात येणार आहे.