लोकमत न्यूज नेटवर्कवेरूळ : श्रावण महिन्यातील तिसºया सोमवारी (दि.७) हजारो भाविक श्री घृष्णेश्वराच्या चरणी नतमस्तक झाले. पहाटे ३ वाजेपासून सुरू असलेली भाविकांची गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती. दिवसभर मंदिर परिसरात ‘ओम नम: शिवाय, हर हर महादेव’चा गजर ऐकू येत होता.भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरात वाहनतळ फुल झाले होते. त्यामुळे अनेक भाविकांना आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करावी लागली. चांगला व्यवसाय होत असल्यामुळे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला.श्री घृष्णेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक शुक्ल, विश्वस्त कमलाकर विटेकर, चंद्रशेखर शेवाळे, राजेंद्र कौशिके, संजय वैद्य, योगेश टोपरे, सुनील विटेकर, राजू वैद्य, मंगेश पैठणकर, पुजारी रवींद्र पुराणिक, महेश वैद्य, सुनील शास्त्री आदींच्या वतीने भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या.
वेरुळात ‘हर हर महादेव’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:37 IST