शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आखाडा तापला

By admin | Updated: September 26, 2014 01:55 IST

बीड : निवडणुका जवळ येऊन ठेपल्या तरी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी उमेदवारी दाखल केली नव्हती़ गुरूवारी पितृपक्ष संपताच घटस्थापनेचा मुहूर्त शोधून मातब्बरांनी उमेदवारी

बीड : निवडणुका जवळ येऊन ठेपल्या तरी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी उमेदवारी दाखल केली नव्हती़ गुरूवारी पितृपक्ष संपताच घटस्थापनेचा मुहूर्त शोधून मातब्बरांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी केली होती़बीडमध्ये पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शक्तीप्रदर्शन केले़ गेवराईत आ़ बदामराव पंडित, आष्टीत राज्यमंत्री सुरेश धस, भीमराव धोंडे, परळीत आ़ धनंजय मुंडे, आ़ पंकजा मुंडे, केजमध्ये शेकापचे डॉ़ राजेश इंगोले यांनी उमेदवारी भरली़ गुरूवारी एकाच दिवशी १५ जणांचे १७ अर्ज दाखल झाले़ दिग्गज आखाड्यात उतरल्याने आता प्रचाराला रंगत येणार आहे़ (प्रतिनिधी)बीड : पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधान सभा निवडणुकीसाठी गुरूवारी भव्य शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने काढलेल्या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते़ त्यामुळे शहर दणाणून गेले़शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरु झाले. रॅलीच्या सुरुवातीच्या पुर्वी पालकमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर रॅली माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, बशीर गंज चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आली. तेथे पालकमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. ठिकठिकाणी त्यांना कार्यकर्त्यांनी हार घालून त्यांचा सत्कार केला. रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ढोल ताशांचा तालावर अनेकांनी आपला आनंद व्यक्त केला. रॅलीत रवींद्र क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सभापती, संदीप क्षीरगसार, योगेश क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, रॉकांचे जिल्हाध्यक्ष अशोक डक, अ‍ॅड. सुभाष राऊत, माजी आमदार सय्यद सलीम, शेख शफीक, विलास विधाते, गंगाधर घुमरे, माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, अ‍ॅड. इरफान बागवान, शाहेद पटेल, विष्णू देवकते, अशोक रोमन, कुलदीप जाधव, दीपक थोरात, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)