शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कुख्यात घरफोड्या अजय ठाकूरचा फौजदारावर हल्ला

By admin | Updated: July 22, 2016 00:44 IST

औरंगाबाद : कुख्यात घरफोड्या अजय ठाकूर याने त्यास पकडण्यासाठी आलेले गुन्हे शाखेचे फौजदार अनिल वाघ यांच्या अंगावर थेट पल्सर मोटारसायकल घालून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

औरंगाबाद : अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकमा देणारा कुख्यात घरफोड्या अजय ठाकूर याने त्यास पकडण्यासाठी आलेले गुन्हे शाखेचे फौजदार अनिल वाघ यांच्या अंगावर थेट पल्सर मोटारसायकल घालून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यावेळी वाघ यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी घेतल्याने ते बालंबाल बचावले. मात्र त्यानंतरही त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. एखाद्या सिनेमातील प्रसंगाप्रमाणे बीड बायपासवर हा थरार गुरुवारी रात्री नागरिकांना अनुभवायला मिळाला.याविषयी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती म्हणाले की, कुख्यात घरफोड्या अजय ठाकूर मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. शिवाय न्यायालयानेही त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलेले आहे. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. तो जालना येथे गेल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना सांगितली. त्यामुळे गुन्हे शाखेचे फौजदार अमित बागूल, फौजदार प्रशांत आवारे, सहायक फौजदार ससाणे यांचे पथक जालना येथे त्यास पकडण्यासाठी गेले होते. यावेळी साध्या वेशातील बागूल यांना त्याने ओळखले. त्यांना चकमा देऊन तो जालना येथून निसटला. जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मार्गावर पोलिसांनी सापळा रचला होता आणि अजय हा मोटारसायकलवर होता. औरंगाबादेत न येता तो अंबडमार्गे गेला. त्यानंतर तो बीड बायपास रोडने गेल्याचे समजले. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी फौजदार अनिल वाघ आणि कर्मचाऱ्यांना बीड बायपास रोडवर सापळा रचण्यास सांगितले. त्यानंतर फौजदार वाघ, कर्मचारी मनोज चव्हाण, संतोष सूर्यवंशी, शिवाजी भोसले बीड बायपासवर त्याला पकडण्यासाठी खाजगी वाहनात बसून होते. तो दिसताच फौजदार वाघ हे त्यास आडवे झाले. त्यावेळी सिनेस्टाईलने अजय याने थेट वाघ यांच्या अंगावर मोटारसायकल घातली. त्यावेळी वाघ यांनी बाजूला उडी घेतल्याने ते बालंबाल बचावले. मात्र त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्याच्या दुचाकीवर झडप घातली.