शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही २२ रोहित्र धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:59 IST

हिंगोली : शहरातील वीजपुरवठ्यासाठी हिंगोली शहरात महावितरणची एकूण २७६ रोहित्रे आहेत. यातील निम्म्या रोहित्रांना दरवाजेच नाहीत. महावितरणकडून नुकतेच दरवाजे नसलेल्या रोहित्रांचे सर्वेक्षण केले. त्यात जवळपास २२ रोहित्र अधिक धोकादायक असल्याचे समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील वीजपुरवठ्यासाठी हिंगोली शहरात महावितरणची एकूण २७६ रोहित्रे आहेत. यातील निम्म्या रोहित्रांना दरवाजेच नाहीत. महावितरणकडून नुकतेच दरवाजे नसलेल्या रोहित्रांचे सर्वेक्षण केले. त्यात जवळपास २२ रोहित्र अधिक धोकादायक असल्याचे समोर आले.हिंगोली शहरात महावितरणच्या रोहित्रांचे फ्यूज बॉक्स उघडे असल्याने अपघात होण्याची भीती आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. शहर परिसरात जवळपास २७६ विद्युत रोहित्र आहेत. सदर रोहित्रास तारकुंपन तसेच फ्यूज बॉक्सला दरवाजे नाहीत. अनेकदा विद्युत तारांचे घर्षण होऊन आग लागण्याच्या घटना घडतात. शहरातील शालेय परिसर तसेच विविध प्रभागांतील रोहित्रांची दयनीय अवस्था आहे. काही रोहित्रांमधून तर चक्क आॅईल गळती होते. यामुळे आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश रोहित्र व फ्यूज बॉक्स मुख्य रस्त्यांवरच असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरणकडून किरकोळ दुरूस्ती केली की अवस्था ‘जैसे थे’ होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. अनेक फ्यूज बॉक्स उघड्यावर असल्याने रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, शाळकरी मुले तसेच जनावरांना विजेचा धक्का लागण्याची दाट शक्यता आहे. महावितरण कंपनीने धोकादायक रोहित्र व फ्यूज बॉक्सची तत्काळ दुरूस्ती करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे शालेय परिसरातील उघड्या रोहित्राकडेही महाविरणने लक्ष देणे गरजे आहे. जेणेकरुन पुढील हानी टळेल.