शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ विस्तारीकरण; मार्ग झाला मोकळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:37 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने २२ नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने २२ नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विमानतळ विस्तारीकरणाला मोठ्या प्रमाणात वेग येण्याची शक्यता आहे. या कंपनीने मोजणी शुल्काचा भरणा तात्काळ करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. धावपट्टी विस्तारीकरणातील प्रमुख अडसर दूर झाला आहे. चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न रखडल्यामुळे अनेकदा बैठका घेऊन चिंतन करण्यात आले. गेल्यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही विस्तारीकरणाबाबत निर्णय झाला. त्यासाठी दोनशे कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली होती. विलंबामुळे भूसंपादनासह ६०० कोटी रुपयांपर्यंत खर्चाचा आकडा समोर आला.डीएमआयसी प्रकल्पात किया मोटार्स हा अँकर प्रकल्प येणार होता. कंपनीने विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सुविधा नसल्याने प्रकल्प आंध्र प्रदेशात हलविला.लोकप्रतिनिधी, उद्योजकांनी विमानतळ विस्तारीकरणाप्रसंगी वारंवार मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली. तसेच भूसंपादनातील सिडको व बांधकाम विभागाकडील समस्याही मांडल्या. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बैठका घेऊन या विषयाला गती देण्याचा प्रयत्नकेला.