शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

विमान प्रवास स्वप्नवतच-पूजा

By admin | Updated: July 14, 2014 01:02 IST

शेषराव वायाळ , परतूर विमानात बसण्याचं स्वप्नसुद्धा कधी पाहिलं नव्हतं. पंतप्रधानांची भेट हा विषय गावीही नाही.

शेषराव वायाळ , परतूरविमानात बसण्याचं स्वप्नसुद्धा कधी पाहिलं नव्हतं. पंतप्रधानांची भेट हा विषय गावीही नाही. पण हे स्वप्न आपण पाहू व प्रत्यक्षात साकारु शकलो ते केवळ ‘लोकमत’मुळेच अशी बोलकी प्रतिक्रिया हवाई सफरीने भारावून गेलेल्या पूजा ठाकरची...परतूर शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची पूजा बालासाहेब ठाकर ही विद्यार्थिनी. इयत्ता सहावीत. मैत्रीणींनबरोबर बागडणं. खेळणं अन् अभ्यासात रमणं हेच तिच विश्व. भविष्यासह करिअर संदर्भात कधी गांभीर्याने मनातही विचारही केला नाही. मुळातच तसं तिच वयही नाही. मात्र चिमुकलीने काही स्वप्न रंगविले. तेही छोटे छोटे. मात्र एक दिवस असा आला की तिने कधी न पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारले. ते लोकमतच्या संस्काराचे मोती या स्पर्धेच्या माध्यमातून...गेल्यावर्षी लोकमतने आयोजित केलेल्या संस्काराचे मोती स्पर्धेत या चिमुकलीने सहभाग नोंदविला. स्पर्धेची कूपन्स जमा केली. प्रवेशिकेवर चिटकविली. ती प्रवेशिका शाळेत जमा केली. अन् इतरांप्रमाणे तीही या स्पर्धेच्या निकालाच्या प्रतीक्षेत होती. फेब्रुवारी २०१३चा दिवस. लोेकमतने घेतलेल्या संस्काराचे मोती या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. त्यात तिची हजारो स्पर्धकांतून हवाई सफरसाठी निवड झाली. लोकमतच्या प्रतिनिधीने तिच्यासह कुुटुंबियांना आनंदाची बातमी सांगितली तेंव्हा या सुखद धक्क्याने कुटुंबिय आनंदाने बेभान झाले. तेथूनच पूजा हिला हवाई सफरीसह देशाच्या पंतप्रधान भेटीचे वेध लागले. १० जुलै रोजी ती मुंबईहून दिल्लीला विमानाद्वारे रवाना झाली.थेट देशाच्या पंतप्रधानांना भेटून ती शुक्रवारी ती गावी परतली. भारवलेल्या स्थितीतच. या अविस्मरणीय अनुभवाचे लोकमतशी बोल एकविताना पूजा हिच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू तरळले. कुटुंबिय सुद्धा तिच्या अनुभव कथनाने भारावून गेले होते.मुळातच जिज्ञासू वृत्ती, परखड स्वभाव. रायपूर सारख्या छोट्याशा खेड्यातील तिची जडणघडण मात्र कोठेही लाजराबुजरा स्वभाव आडवा येऊ न देता ती दिल्लीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वावरली. हे घडलं केवळ ते लोकमतमुळेच. असे प्रांजळपणे नमूद करीत पूजा अडखळली.... माझ्या जीवनात एवढ्या लवकरच व एवढा मोठा आनंदाचा क्षण येईल असे कधीच वाटले नाही. असे नमूद करीत पूजा हिने विमान केवळ चित्रात बघितले होते. त्यात बसून चक्क देशाच्या राजधानीपर्यंत जाऊ असे कधीच ध्यानीही आले नाही. त्याचबरोबर देशाच्या पंतप्रधानांना भेटणे हा सुवर्णयोगच होता. तोही याचि देह याचि डोळा.. अनुभवला असे तिने म्हटले.राज्याची राजधानी मुंबई. तीही पाहिली पहिल्यांदाच. चकचकीत विमानतळ. भले मोठे विमान. त्यातील हवाई सुंदरी, ऐटदार आसन व्यवस्था, विमान उडतानाचा थरार, खिडकीतून बाहेर डोकावल्यानंतर दिसणारे विलोभणीय दृश्य. छोट छोट्या इमारती. जागो जागी हिरवळ, पाणी वगैरे गोष्टी आपण डोळ्यांत साठविल्या. असे पूजा म्हणाली. दिल्लीत उतरल्यानंतर इंडिया गेटवरील भेट, शहिदांना वाहिलेली श्रद्धांजली, महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन हे आपल्या जीवनातील विस्मरणीय क्षण आहेत. पंतप्रधान मोदी यांना टीव्हीवर पाहिले होते. प्रत्यक्षातील त्यांची भेट. मराठीतून गप्पागोष्टी व त्यांच्या बरोबर छायाचित्र काढण्याचा योग दुर्मिळच होता असे तिने म्हटले. माझी शाळा, आमचे गुरुजन व लोकमत परिवारामुळेच हे सारे शक्य झाले. हा क्षण जीवनाला कलाटणी देणार ठरेल असे ती म्हणाली.परतूरच्या शाळेलाही मिळाला मानमाझी मुलीची हवाई सफर, थेट पंतप्रधानांची भेट हे केवळ लोकमतमुळेच शक्य झाले. अशी प्रतिक्रिया पूजाचे वडील बालासाहेब ठाकर यांनी दिली. आपली मुलगी मुंबई, दिल्लीत जाईल तेही विमानाने, देशाच्या पंतप्रधानांच्या भेटीला हे कधी स्वप्नही पाहिले नाही. ते प्रत्यक्षात साकारले. त्यामुळे खूप आनंद वाटतो आहे, अशी प्रतिक्रिया पूजाची आई कोकिळा ठाकर यांनी व्यक्त केली.जिल्ह्यात आमच्या शाळेला मान मिळाला. आमची विद्यार्थिनी विमाने दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटली. हे केवळ लोकमतमुळेच शक्य झाले. लोकमत परिवाराचे आभार. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया विठ्ठलराव काळुंके यांनी व्यक्त केली.