शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने औरंगाबाद विमानतळावरील विमानसेवेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 12:34 IST

शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शहरातील हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायालाही फटका बसणार आहे.

औरंगाबाद, दि. २५ : शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शहरातील हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायालाही फटका बसणार आहे. 

 शिर्डी येथील विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने २१ सप्टेंबरला सार्वजनिक वापराचे विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना जारी केला. त्यामुळे साई भक्तांची सोय होणार आहे; परंतु अवघ्या ११० कि.मी. अंतरावरील या विमानतळामुळे औरंगाबादच्या विमानतळावर आगामी काळात परिणाम होऊ शकतो.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या  सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले. 

ट्रूजेटच्या विमानाने तिरुपतीला जाणा-या आणि दक्षिणेतून शिर्डी दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या मोठी आहे.  प्रत्येक दिवशीचे विमान प्रवाशांनी भरून जाते. या विमानाने औरंगाबादला आल्यानंतर प्रवाशांना ट्रॅव्हल्सने शिर्डीला ये-जा करावी लागते. त्यासाठी मोठा खर्च होतो. हा खर्च वाचविण्यासाठी ही विमानसेवा औरंगाबादऐवजी हैदराबाद-शिर्डी अशी थेट होऊ शकते. 

दिल्लीवरून येणा-या एअर इंडियाच्या विमानातून ३० ते ४० टक्के प्रवासी शिर्डीला जाण्यासाठी येतात. दिल्ली-शिर्डी विमानसेवेमुळे प्रवासी औरंगाबादला वळसा घालणे टाळू शकतात. शिर्डीसाठी येणारे प्रवासी औरंगाबादेत हॉटेलमध्ये अनेकदा मुक्काम करतात. येथून खाजगी वाहनांनी शिर्डीला जातात. नव्या विमानतळाचा या व्यवसायावर फरक पडेल.ट्रूजेटच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

पाठपुरावा करूशिर्डी विमानतळामुळे औरंगाबादवर परिणाम होईल, असे वाटत नाही. या विमानतळामुळे औरंगाबादचे एखादे विमान बंद होणार असेल तर ‘सीएमआयए’ तसे होऊ देणार नाही. औरंगाबादेत आल्यावर भाविक  थेट शिर्डीला जातात. त्यामुळे शहरातील हॉटेल्सवर फारसा फरक पडणार नाही.-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)

निश्चित परिणामशिर्डी विमानतळ विकसित होणार आहे. औरंगाबादला येऊन शिर्डीला वाहनांनी जाण्याऐवजी प्रवासी थेट विमानाने जातील. त्यामुळे आगामी कालावधीत त्याचा औरंगाबादवर निश्चित परिणाम होईल. -अब्दुल अजीज, व्यावसायिक, टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स