शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

एड्सच्या रुग्ण संख्येत घट

By admin | Updated: December 1, 2015 00:30 IST

बाळासाहेब जाधव , लातूर निरक्षरता, अज्ञान, खेड्याकडून शहराकडे होणारे स्थलांतर, वाढती बेरोजगारी या कारणामुळे दिवसेंदिवस एड्सच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती़

बाळासाहेब जाधव , लातूरनिरक्षरता, अज्ञान, खेड्याकडून शहराकडे होणारे स्थलांतर, वाढती बेरोजगारी या कारणामुळे दिवसेंदिवस एड्सच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती़ परंतू जिल्हा एड्स प्रतिबंधक पथक व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केलेल्या जनजागृतीमुळे १३ वर्षाच्या कालावधीत एड्स रुग्ण संख्येत घट झाली आहे़ २००३ मध्ये २ हजार ७० रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यावेळी पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा ११़४० टक्क्यांवर होता़ २०१५ मध्ये हा आकडा ०़५७ वर आला आहे़ १३ वर्षामध्ये एकूण टक्केवारीच्या प्रमाणात एड्स बाधीत रुग्णांच्या संख्येत २़२४ टक्क्याने घट झाली आहे़ लातूर जिल्ह्यात ४६ पीएसीच्या माध्यमातून एड्स बाधीत रुग्णांवर उपचार करण्याची प्रक्रिया सुरु आहे़ यासाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी आयसीसीटी केंद्र व दोन औषधोपचार केंद्र उभारण्यात आले आहेत़ शिवाय, वेळोवेळी केलेल्या जनजागृतीमुळे एचआयव्हीचा प्रसार होत होता़ त्याच प्रमाणात आज घट झाली असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे़ २००३ मध्ये २०७० रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यातील २३६ रुग्ण पॉझिटीव्ह निघाले़ त्यावेळी पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ११़४० टक्क्यांवर होती़ २००४ मध्ये ६३२२ रुग्णांची तपासणी करण्यात आली़ १९६ रुग्ण पॉझिटीव्ह निघाले़ २००५ मध्ये ४ हजार ८३१ रुग्णांपैकी ३५८ रुग्ण, २००६ मध्ये १० हजार ५२३ रुग्णांपैकी १ हजार ८१, २००७ मध्ये २५ हजार ८५७ रुग्णांपैकी १ हजार ८१० रुग्ण पॉझिटीव्ह, २००८ मध्ये ३६ हजार ९३२ रुग्णांपैकी १८३८ रुग्ण, २००९ मध्ये ५६ हजार ७८१ रुग्णांपैकी १ हजार ८२० रुग्ण, २०१० मध्ये ५६ हजार ९१७ रुग्णांपैकी १६६० रुग्ण, २०११ मध्ये ६२ हजार ९६१ रुग्णांपैकी ११९२ रुग्ण, २०१२ मध्ये ६८ हजार ५१ रुग्णांपैकी १ हजार ७१, २०१३ मध्ये ७४ हजार ७५२ रुग्णांपैकी ९५२, २०१४ मध्ये १ लाख १२ हजार ७७२ रुग्णांपैकी ९५५ रुग्ण तर जानेवारी ते आॅगस्ट २०१५ या आठ महिन्याच्या कालावधीत ९० हजार १३७ रुग्णांपैकी ५२० रुग्ण असा एकूण ६ लाख ८ हजार ९०६ रुग्णांपैकी १३ हजार ६८९ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले़ गेल्या १३ वर्षाच्या तुलनेत एकूण टक्केवारीपैकी २़२४ टक्क्यांवर एड्स बाधीत रुग्णांचा आकडा आला आहे़ यापुढील कालावधीतही एचआयव्ही बाधीत रुग्णांचा आकडा शुन्यावर आणण्याचा संकल्प असल्याचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी उमेश आडे, जिल्हा परिवेक्षक बिपीन बोराडे यांनी सांगितले़ एड्स जनजागृतीबाबत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीबाबत प्रयत्न केले जात आहेत़ यासाठी ४६ पीएसी, १६ आयसीटी केंद्र, २ औषधोपचार केंद्र या माध्यमातून एचआयव्ही बाधीत रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ या माध्यमातून मृत्यूचाही दर शून्यावर आणला जाणार असल्याचा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ के़ एच़ दुधाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़