शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धक्कादायकच,विद्यार्थ्यांकडे परीक्षेपूर्वीच थेट उत्तरपत्रिका; ग्रामीण केंद्रावर शहरवासीयांची सोय

By योगेश पायघन | Updated: January 5, 2023 07:15 IST

विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील धक्कादायक प्रकार;ॲडमिशन सोबत पासिंगची हमी ?

- योगेश पायघनऔरंगाबाद : पदवी परीक्षेत पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना उत्तरांची काॅपी मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावंगी येथील अपेक्स महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची काॅपी पर्यवेक्षकांनी पकडल्यावर त्याने या प्रकाराची कबुली दिली. उत्तराची काॅपी परीक्षेपूर्वीच सापडल्याचे त्याने स्वत: परीक्षा केंद्राकडे लिहूनही दिले. आलिशान वाहनातून आलेला युवक विद्यार्थ्यांच्या ‘सोयीसुविधे’वर विशेष लक्ष देत असल्याचा प्रकारही समोर आला.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रामीण परीक्षा केंद्र असलेल्या अपेक्स महाविद्यालयात बीसीएस प्रथम वर्षाच्या प्रोग्रामिंग ऑफ स्टॅटेस्टिक आणि बी.एसस्सी.चा मायक्रोबायोलाॅजी १ आणि २ हा पेपर बुधवारी होता. बीसीएसचे सावंगीतील पद्मावती महाविद्यालय, अपेक्स महाविद्यालय आणि शहरातील सुप्रियाताई सुळे महाविद्यालयाचे १४९ विद्यार्थी परीक्षेसाठी होते, तर बी.एसस्सी.साठी हर्सूलमधील हरसिद्धी कला विज्ञान महाविद्यालय आणि जनता काॅलेजचे ९ विद्यार्थी परीक्षेला होते. प्रथम वर्ष पदवीच्या शेवटच्या पेपरची बैठक व्यवस्थेची तयारी सुरू होती.

गैरप्रकाराची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर लोकमत प्रतिनिधीने बुधवारी १.३० वाजता अपेक्स महाविद्यालय गाठले. दुपारी १.४५ वाजता एक आलिशान कार काॅलेजशेजारी परीक्षा हाॅलजवळ येऊन थांबली. अवघ्या पाच मिनिटांत विद्यार्थ्यांनी त्या कारभोवती गराडा घातला. कारमधील युवकासोबत विद्यार्थ्यांनी चर्चा केल्यावर विद्यार्थी परीक्षा कक्षात गेले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. मंझा यांच्या पथकाने केंद्रावर पाच परीक्षार्थ्यांचे पेपर पहिल्या तासाभरातच जमा केले. दरम्यान, कार निघून गेली. पथकाने परीक्षा केंद्र, परिसरातील व्हिडीओ, फोटो घेतले. या संबंधीचा अहवाल कुलगुरूंना सादर केल्यावर निर्देशानुसार पुढील कारवाई होईल, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले, तर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकारावर शहानिशा केल्याशिवाय बोलण्यास नकार दिला.

ॲडमिशन सोबत पासिंगची हमी ?ॲडमिशन सोबत पास करण्याचीही हमी देण्याचा हा प्रकार आहे. त्यासाठी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची विशेष सोय ठेवण्यात येत आहे. यावर परीक्षा मंडळ काय कारवाई करते तसेच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांकडे उत्तरे आली कशी? जबाबदारांना शोधणार कसे याकडेही लक्ष लागले आहे.

परीक्षा मंडळाचे संचालक पोहोचलेही माहिती मिळाल्यावर १.५० वाजता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांचे पथक केंद्रावर पोहोचले. त्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच परीक्षा होईपर्यंत तेथे ठाण मांडले. दरम्यान, एका विद्यार्थिनीसह ३ काॅपीबहाद्दर विद्यार्थी आणि आपसात बोलणाऱ्या २ विद्यार्थिनींच्या उत्तरपत्रिका जमा करून महाविद्यालयाकडून अहवाल घेत पेपर संपल्यावर पथक रवाना झाले.

विद्यार्थ्याची दोन दिवसांपूर्वी कबुलीमहाविद्यालयाबाहेर एक युवक येऊन परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी पुरवत असल्याने त्या युवकाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तसे काही करत असल्याचा इन्कार केला होता. पथकाला घडलेल्या घटनेचा आणि परीक्षेपूर्वी हातावर उत्तरे लिहून परीक्षा हॉलमध्ये आलेल्या विद्यार्थ्याचा अहवाल पथकाला दिला आहे.-राहुल पाटील, संचालक, अपेक्स महाद्यालय, सावंगी

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र