शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरची कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त?

By admin | Updated: April 22, 2016 00:31 IST

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी मंडळ बरखास्त करण्यात आल्याची चर्चा गुरुवारी शहरात जोरदार रंगली़ यावर जिल्हा उपनिबंधकांनी मौन पाळणे पसंत केले

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी मंडळ बरखास्त करण्यात आल्याची चर्चा गुरुवारी शहरात जोरदार रंगली़ यावर जिल्हा उपनिबंधकांनी मौन पाळणे पसंत केले असले तरी, शुक्रवारी याबाबत स्पष्ट सांगेन, असे सूचक संकेत त्यांनी दिले आहेत़उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह अन्य काही जणांनी तक्रारी केल्या होत्या़ बाजार समितीत विविध स्तरावर मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तसेच परवानग्या न घेताच वेगवेगळ्या योजना राबविल्याचा आरोप करण्यात आलेला आहे़ या तक्रारींची गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चौकश्या होत होत्या़ त्यानंतर चौकशी अहवालाच्या आधारे गुरुवारी बाजार समिती बरखास्त करण्यात आल्याची माहिती बाहेर आली़ परंतु, यास सायंकाळपर्यंत कोणीही अधिकृत दुजोरा दिला नाही़ याबाबत पणन महामंडळाचे उपसंचालक चंद्रकांत टिकुळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी बरखास्तीचे अधिकारी जिल्हा उपनिबंधकांना असल्याचे सांगून त्यांच्याकडून अद्याप तसा कोणताही अहवाल आला नसल्याचे म्हटले़ जिल्हा उपनिबंधक बी़एल़ वांगे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, यावर आज काहीही सांगू शकत नाही़ उद्या बोलेन, असे सांगून सूचक संकेत मात्र दिले़ आमदार सुधाकर भालेराव यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेली बाजार समिती बरखास्त झाल्याचे ठासून सांगताना त्याचे आदेश निघत असल्याचे सांगितले़ आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचेही ते म्हणाले़ सभापती शिवाजी हुडे यांनी याबाबत अधिकृत अशी कोणतीही सूचना अथवा माहिती आपल्याकडे आली नसल्याचे स्पष्ट केले़ (वार्ताहर)