शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२ एकर पिकातून साकारला खिर्डीत कृषी महागणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:37 IST

२ एकर शेतात उभ्या पिकातून महागणपती आकाराला आला आहे. २०० फूट बाय ४०० फूट लांबी रुंदीची कृषी प्रतिमा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून गर्दी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : २ एकर शेतात उभ्या पिकातून महागणपती आकाराला आला आहे. २०० फूट बाय ४०० फूट लांबी रुंदीची कृषी प्रतिमा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून गर्दी होत आहे. प्रतिमा एवढी भव्य आहे की, ती पाहण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.शहरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळाचे विलास कोरडे व अलका कोरडे या दाम्पत्यांनी खुलताबाद तालुक्यातील खिर्डी गावात २ एकर शेतात पिकातून भव्य प्रतिमा नियोजनबद्ध तयार करण्यात आली आहे. यासाठी २५ किलो गहू, १० किलो मका, १० किलो ज्वारी, १० किलो हरभºयाची दोन महिन्यांपूर्वी गणपतीचा आकार देत पेरणी करण्यात आली. आता पीक ३ फुटांपेक्षा अधिक उंच झाल्यावर त्यास महागणपतीचा आकार प्राप्त झाला आहे. गणेशाचे डोळे, जानवे व हार तयार करण्यासाठी बेडशिट, घोंगडी, चादर, मल्चिंग पेपर व फुले यांचा वापर करण्यात आला आहे. यंदा खिर्डी परिसरात कमी पाऊस झाला; पण येथील शेततळ्यात मागील वर्षीपासून साठवून ठेवलेल्या पाण्यावरच पीक खुलले. या महागणपतीच्या देखाव्यातून ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’, ‘शेततळी तयार करा, ‘ सर्वांनी एकत्र येऊन पाण्याचे योग्य ते नियोजन करावे,’ असा संदेश गावकºयांना देण्यात येत आहे. तसेच या मंडळाच्या वतीने खिर्डी ग्रामपंचायतला ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ या योजनेसाठी ११ हजार रुपयांची देणगीही देण्यात आली आहे.देखाव्यासाठी किशोेर हिवर्डे, रमेश हिवर्डे, राजू राठोड, वैभव कोरडे, कैलास खंदारे, चंद्रमणी जायभाये, संजय राठोड, अतुल सावजी, प्रल्हाद गायकवाड, भाऊसाहेब घुगे, सज्जू जहागीरदार, अतिक पठाण, शेख मजहर, राजू दौेड, संतोष गायकवाड, अनिल गावंडे आदींनी परिश्रम घेतले.