शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

औरंगाबाद शहर बससाठी एस.टी.सोबत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:26 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका १०० मिडी बस खरेदी करणार आहे. दिवाळीपूर्वी ३० पेक्षा अधिक बस टाटा कंपनीकडून ...

ठळक मुद्देपहिल्या माळेचा मुहूर्त : पाडव्याला शुभारंभ करण्याचा निर्धार

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका १०० मिडी बस खरेदी करणार आहे. दिवाळीपूर्वी ३० पेक्षा अधिक बस टाटा कंपनीकडून प्राप्त होणार आहेत. या बस चालविण्याची जबाबदारी आज एस.टी. महामंडळाने स्वीकारली. महामंडळाने नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेचा मुहूर्त साधत महापालिकेसोबत सामंजस्य करारही केला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एस.टी. आणि मनपा यांच्यातील हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. पाच वर्षे महामंडळ बस चालविण्याची सेवा देणार आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी झाली. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल आणि स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. महापालिकेने खरेदी केलेल्या १०० बस पाच वर्षांसाठी एस.टी. महामंडळ चालविणार, असे करारात ठरले. आॅक्टोबर अखेरपर्यंत बस शहरात दाखल होतील. उर्वरित बस जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत येतील. प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न दररोज स्मार्ट सिटी विकास महामंडळात जमा होईल. तिकीट दर, वाहतुकीचे मार्ग ठरविण्याचा अधिकारही स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाला राहील. १०० बससाठी लागणारे मनुष्यबळ, बसची देखभाल, पार्किंग व्यवस्था एस.टी. महामंडळ करणार आहे. याबाबत एस.टी.ला दरमहा ठराविक भाडे देण्यात येईल. बससेवा सुरू करण्यासाठी लागणाºया सर्व परवानग्या मिळविण्याची जबाबदारी स्मार्ट सिटीची म्हणजेच मनपाची राहणार आहे. बसथांबे अद्ययावत करणे, जागा निश्चित करण्याचे काम मनपाचे राहणार आहे. ठिकठिकाणी नियंत्रण कक्ष उघडण्यात येतील. शालेय विद्यार्थी, अंध, दिव्यांग बांधवांना या सेवेत अनुक्रमे ६७, ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात १९९१ पासून एस.टी. महामंडळ शहर बससेवा चालवत आहे. आतापर्यंत महामंडळाला १ हजार १८७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.बससेवेची वैशिष्ट्ये१२५ रस्त्यांवरून नवीन बस धावतील.४५० कर्मचारी एस.टी.चे राहतील.११० बसथांबे अद्ययावत उभारणार.

टॅग्स :Bus DriverबसचालकPublic Transportसार्वजनिक वाहतूक