शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या विरोधात १२ जून रोजी शेतकरी परिषद

By admin | Updated: June 8, 2017 00:41 IST

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाच्या विरोधात शरद पवार यांच्या उपस्थितीत १२ जून रोजी सिडको नाट्यगृह येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समृद्धी महामार्गाच्या विरोधात माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत १२ जून रोजी सिडको नाट्यगृह येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला महामार्ग ज्या जिल्ह्यांतून जात आहे,अशा १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याचे संयोजन समितीने बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.आ.सतीश चव्हाण, आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आ.कल्याण काळे, अभिजित देशमुख, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डॉ.भालचंद्र कांगो, प्रा.राम बाहेती, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विनायक पवार, कचरूडुकले, बबन हारणे यांची यावेळी उपस्थिती होती. आ.चव्हाण यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग विरोधी कृती समिती या बॅनरखाली सर्व १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे एकीकरण होणार असून, सर्व ते सर्वपक्षीय शेतकऱ्यांसाठी व्यासपीठ असणार आहे. १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मत ऐकल्यानंतर समृद्धीच्या बाबतीत खा.पवार निर्णायक आंदोलनाची भूमिका जाहीर करतील. ३० मे रोजी शेतकऱ्यांनी खा.पवार यांची भेट घेऊन समस्या मांडून या लढ्याचे नेतृत्व करावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती. भूसंपादन सक्तीने होत आहे. त्यामुळे मोबदल्याचा मुद्दा नंतर असेल मुळात शेतकऱ्यांना या मार्गासाठी जमीन द्यायची नाही. पोलीस बळाचा वापर केला जात आहे, रात्रभर आरोपींसारखे शेतकऱ्यांना डांबून ठेवले जात आहे. जमिनीच्या मोजणीसाठी जाताना शेकडो पोलीस शेतकऱ्यांच्या दारात उभे केले जात आहेत. २०१३ च्या भूसंपादन कायद्याऐवजी १९५५ च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी शासन करीत आहे. काही मध्यस्थ मुली शेतकऱ्यांच्या कुटुंबात बुद्धिभेद करून जमिनी देण्यास भाग पाडत आहेत. या सगळ्या प्रकाराविरोधात शेतकऱ्यांची परिषद असल्याचे यावेळी सांगण्यात आले.