शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीवरून पुन्हा वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:37 IST

फेअर अ‍ॅव्हरेज क्वॉलिटी (एफएक्यू ) दर्जाची तूर नसल्याने गुणवत्ता तपासणी कर्मचा-याने शुक्रवारी दोन शेतक-यांची तूर निकृष्ट असल्याचे सांगितले. चाळणी न करता तूर तपासली जात असल्याने संतापलेल्या त्या शेतक-यांनी अर्धा किलो तूर जाळून शासनाचा निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : फेअर अ‍ॅव्हरेज क्वॉलिटी (एफएक्यू ) दर्जाची तूर नसल्याने गुणवत्ता तपासणी कर्मचा-याने शुक्रवारी दोन शेतक-यांची तूर निकृष्ट असल्याचे सांगितले. चाळणी न करता तूर तपासली जात असल्याने संतापलेल्या त्या शेतक-यांनी अर्धा किलो तूर जाळून शासनाचा निषेध केला. या गोंधळामुळे अर्धा ते एक तास जाधववाडीतील शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली होती.जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या वतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर मागील ५ दिवसांमध्ये ३१० शेतक-यांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले असून, २० शेतक-यांकडून १७५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तूर खरेदीचे काम नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने करण्यात येत आहे. आज सकाळी तूर खरेदी केंद्राबाहेर तीन ते चार पिकअप वाहने व दोन ट्रॅक्टर भरून शेतक-यांनी तूर विक्रीस आणली होती. येथे गुणवत्ता तपासणी कर्मचारी विनायक डक हे तुरीची तपासणी करीत होते. यावेळी वरूड काझी येथील इलियास बेग व कृष्णा दांडगे या दोन शेतक-यांनी तूर विक्रीसाठी आणली होती. त्यांच्यातील एक जणाची तूर तपासणी करताना त्यात भुंगे आढळून आले. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार सरासरी चांगला दर्जा (एफएक्यू) नसल्याने ती तूर रिजेक्ट करण्यात आली. पहिले तूर चाळणी यंत्रात साफ करून मग तपासणी का करीत नाही, असा सवाल उपस्थित करून केंद्राबाहेर येऊन अर्धा किलो तूर जमिनीवर टाकून ती जाळण्याचा प्रयत्न केला. शासनविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे गोंधळ उडाला गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रप्रमुख ए. एस. तटवारे यांनी केंद्राचे शटर खाली घेतले. काही वेळात जिल्हा मार्केटिंग अधिकारी सी. डी. खाडे, बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठही तेथे दाखल झाले. खाडे यांनी त्या दोन शेतक-यांनी आणलेल्या तुरीची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले. यावेळी पिकअप वाहनामध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या पोत्यातून तुरी काढून विनायक डक यांनी पुन्हा तपासणी केली व निकृष्ट तूर असल्याचे अहवाल दिला. यावेळी टीव्ही चॅनलच्या कॅमेरामनने संपूर्ण तपासणीची शूटिंग केली. यानंतर ‘वाद’ मिटला. नंतर शिल्लक राहिलेल्या शेतक-यांच्या तुरीची तपासणी करण्यात आली.याआधी ५ फेब्रुवारी रोजी काही शेतक-यांनी कृउबा समिती येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला होता. त्यावेळी हेक्टरी कमी तूर खरेदी करीत असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला होता. असे प्रकार नेहमी होत असल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी कर्मचा-यांनी केली.