शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उडीद-मुगानंतर आता सोयाबीनचाही प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:41 IST

जिल्ह्यात तीन ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर केले असले तरीही त्या तिन्ही ठिकाणी अजून सोयाबीन खरेदी सुरू झाली नाही. तर व्यापारी मॉईश्चरच्या नावाखाली लूट करीत असल्याचा आरोप शेतकºयांतून केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात तीन ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर केले असले तरीही त्या तिन्ही ठिकाणी अजून सोयाबीन खरेदी सुरू झाली नाही. तर व्यापारी मॉईश्चरच्या नावाखाली लूट करीत असल्याचा आरोप शेतकºयांतून केला जात आहे.यंदा शासनाने सोयाबीनला तीन हजारांचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकºयांच्या हाती अठराशे ते चोवीससे रुपये पडत आहेत. किरकोळ ढीग दोन हजार आठशे रुपयांपर्यंतच्या किमतीतही घेतले जात आहेत. तर दुसरीकडे सोयाबीन खरेदी केंद्र वेळेत सुरू केले जात नाहीत. नाफेडची खरेदी हिंगोलीत खरेदी-विक्री संघामार्फत केली जाणार आहे. या संस्थेच्या संबंधितांना विचारले तर त्यांनी सोयाबीन उत्पादकतेचा अधिकृत कोणताच पुरावा आला नसल्याचे सांगितले. मार्केटिंग फेडरेशनने दिलेल्या सूचनांनुसारच जिल्हाधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक यांनी पीक पाहणी प्रयोगातून निश्चित केलेल्या आणेवारीप्रमाणेच मालाची खरेदी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच उडीद व मुगाची उत्पादकता कमी असल्याने त्या तुलनेत खरेदी सुरू असल्याचेही ते म्हणाले. तर आता सोयाबीनचा अहवाल मिळताच केला जाईल, असे सांगितले. दुसरीकडे कृषी विभाग मात्र १५ नोव्हेंबरपर्यंत हा अहवाल तयार होईल, असे सांगत होता. त्यामुळे सोयाबीनची हमीभावाने खरेदी बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी राहण्याची शक्यता आहे.संतोष टारफे यांचे निवेदनआ.संतोष टारफे यांनी कळमनुरी येथेही नाफेडमार्फत हमीभावात शेतीमाल खरेदी सुरू करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तर मूग व उडदाची हेक्टरी तीन क्विंटलची मर्यादा उठवा, कापूस खरेदी केंद्र सुरू करून ७ हजार हमीभाव द्या, कर्जमाफी तातडीने शेतकºयांच्या खात्यावर जमा करा आदी मागण्या केल्या आहेत.