शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

बारा वर्षानंतर नाट्यगृह नाट्यरसिकांच्या सेवेत..!

By admin | Updated: April 18, 2017 00:06 IST

उस्मानाबाद : एक-दोन नव्हे, तर तब्बल बारा वर्षानंतर सर्वसामान्य उस्मानाबादकरांसह नाट्य रसिकांच्या नजरा लागलेले अत्याधुनिक नाट्यगृह सेवेत दाखल होत आहे.

उस्मानाबाद : एक-दोन नव्हे, तर तब्बल बारा वर्षानंतर सर्वसामान्य उस्मानाबादकरांसह नाट्य रसिकांच्या नजरा लागलेले अत्याधुनिक नाट्यगृह सेवेत दाखल होत आहे. नाट्यसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने नाट्यगृहाची रेंगाळलेली कामे पूर्ण केली आहेत. या सर्व कामांसाठी कुठल्याही शासन निधीची वाट न बघता स्वनिधीतून सुमारे दोन कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. या माध्यमातून अग्निरोधक यंत्रणेसोबतच अत्याधुनिक लाईट व साऊंड सिस्टीम बसविण्यात आली आहे. एवढेच नाही तर सत्तरवर धूर दर्शही कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे नाट्यसंमेलनादरम्यान नाट्य रसिकांना पुणे, मुंबई सारख्या शहरातील नाट्यगृहात बसल्याची अनुभूती आल्याशिवाय रहाणार नाही !नाट्य रसिकांची मागणी लक्षात घेता, २००३-०४ मध्ये उस्मानाबाद शहरासाठी नाट्यगृह उभारण्यास मंजुरी मिळाली होती. वास्तू उभारण्यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली. तब्बल पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर म्हणजेच २०१० मध्ये नाट्यगृहाची वास्तू उभा राहिली. परंतु, या वास्तुतील महत्वाची कामे अर्धवट अवस्थेत होती. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च होवूनही हे नाट्यगृह अडगळीला पडले होते. उपरोक्त कालावधीत नाट्यगृह पूर्ण करण्याच्या अनुषंगाने वेळोवेळी चर्चा झडत राहिल्या. परंतु, युद्धपातळीवर काम पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाकडून कुठलीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत.दरम्यान, नगराध्यक्षपदी मकरंद राजेनिंबाळकर यांची वर्णी लागल्यानंतर पहिल्याच सभेत नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधी बाकावरील काही सदस्यांनी सदरील नाट्यगृह अर्धवट असल्याचे सांगत ते पूर्ण केल्यानंतरच भाडेतत्वावर द्यावे, अशी भूमिका घेतली. विरोधकांच्या या भूमिकेवरून जवळपास दोन ते तीन सर्वसाधारण सभांमध्ये रणकंदन रंगले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना सभागृह सुरू करण्याच्या निर्णयाला मुरड घालावी लागली होती. दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत नाट्यगृह संमेलनापूर्वी सुरू करायचेच असा चंग बांधून नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी विशेष सभा घेवून नाट्यगृह स्वनिधीतून अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेवून युद्धपातळीवर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर आणखी एक विशेष सभा बोलावून पात्र कंत्राटदाराच्या निविदेला मंजुरी देवून काम सुरू करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच कंत्राटदारानेही कुठल्याही स्वरूपाची दिरंगाई न करता, काम युद्धपातळीवर पूर्ण करीत आणले आहे. काम जवळपास पूर्ण झाल्यात जमा आहे. त्यामुळे तब्बल बारा वर्षानंतर नाट्यगृह सर्वसामान्य उस्मानाबादकरांसह नाट्य रसिकांना अपेक्षित असे नाट्यगृह सेवेत येणार आहे. नाट्यगृह अद्ययावत करण्यासाठी सुमारे दोन कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. ही रक्कम स्वनिधीतून खर्च केली जाणार आहे. दहा हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या येथे यापूर्वीच बांधण्यात आलेल्या आहेत. या टाक्यातील पाणी सर्वत्र फिरविण्यासाठी २ हजार ९ मीटर पाईप बसविण्यात आले आहेत. याशिवाय इमारतीच्या बाहेरील बाजूने ३० पॉर्इंट निश्चित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी अडीच इंची ३० मीटर गुंडाळी पाईप बॉक्समध्ये बसविण्यात आला आहे. नाट्यगृहाची आतील बाजू पाण्याच्या टप्प्यात आणण्यासाठी दरवाजाजवळ सात लहान व्यासाचे व जास्त लांबीचे पाईप बसविण्यात आले ओहत. रंगमंचावरील बाजू पाण्याच्या टप्प्यात आणण्यासाठी २० नोजल बसविण्यात आले असून यामुळे मंचासह सुमारे ६० चौरस मीटरपर्यंत पाण्याचे आपोआप फवारे पडतील. एवढेच नाही तर आग लागण्यासारखी घटना घडल्यानंतर काही क्षणातच याची सूचना मिळावी यासाठी नाट्यगृहामध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ७० धूरदर्शक (स्मोक डिटेक्टर) बसविण्यात येत आहेत. एवढेच नाही तर स्पार्किंग अथवा वायर जळत असल्याची माहिती मिळावी यासाठी ८० चौरस मीटरची कार्यकक्षा असलेले दोन बीम डिटेक्टर बसविले आहेत. ४आग लागण्यासारखी घटना घडल्यानंतर काही क्षणातच याची सूचना मिळावी यासाठी नाट्यगृहामध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ७० धूरदर्शक (स्मोक डिटेक्टर) बसविण्यात येत आहेत. एवढेच नाही तर स्पार्किंग अथवा वायर जळत असल्याची माहिती मिळावी यासाठी ८० चौरस मीटरची कार्यकक्षा असलेले दोन बीम डिटेक्टर बसविले आहेत. ही सर्व कामे करून घेण्यासाठी तज्ज्ञ मजूर व कारागीर तैनात करण्यात आले आहेत.