शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांनंतर खुनाचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:16 IST

तीन महिन्यांपूर्वी सुखना नदीपात्रात दुचाकीसह मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाची चौघांनी हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वहिनीवर वाईट नजर असल्याच्या संशयावरून चार जणांनी तरुणाच्या डोक्यात धारदार कोयत्याने आणि कुºहाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी चार तरुणांना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी सुखना नदीपात्रात दुचाकीसह मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाची चौघांनी हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वहिनीवर वाईट नजर असल्याच्या संशयावरून चार जणांनी तरुणाच्या डोक्यात धारदार कोयत्याने आणि कुºहाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी चार तरुणांना अटक केली.नारायण रतन गरंडवाल (२५), समाधान गणेश कालभिले (२३), राजू तुळशीराम पवार (२१) आणि सुनील गणेश घोगरे (२१, सर्व रा.जुना चिकलठाणा बायपास रोड परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर कृष्णा एकनाथ कोरडे (२२, रा. जुना चिकलठाणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात म्हणाले की, मृत आणि आरोपी एकाच एरियामधील रहिवासी आहेत. मृत हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. वहिनीवर कृष्णाची वाईट नजर असल्याचा संशय नारायणच्या भावाला होता. यावरून त्याच्या भावासोबत जुलै महिन्यात भांडणही झाले होते. ही बाब नारायणला माहीत झाल्याने त्याने कृष्णाचा काटा काढण्यासाठी तीन मित्रांच्या मदतीने कट रचला. कटानुसार १५ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास नारायण हा कृष्णाला जेवण करण्याच्या बहाण्याने एका हॉटेलवर घेऊन गेला. तेथे दोघांनी एकत्र मद्य प्राशन केल्यानंतर जेवण केले. यानंतर कृष्णाच्या मागे दुचाकीवर बसून ते घरी जात असताना सुखना नदीच्या काठावर लघुशंकेच्या बहाण्याने दुचाकी थांबविली. यावेळी नारायणने अन्य आरोपींना फोन करून बोलावून घेतले. यावेळी नारायणने कृष्णाशी वाद उकरून काढून भांडण सुरू केले. यावेळी कृष्णाने नारायणची कॉलर पकडताच आधीच तेथे लपून बसलेल्या अन्य आरोपींनी धारदार कोयत्याने आणि कुºहाडीने त्याच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला. त्यावेळी सुखना नदीला पूर आलेला होता.यावेळी आरोपींनी कृष्णाला दुचाकीसह नदीत ढकलून दिले. यानंतर ते तेथून पसार झाले. दुसºया दिवशी कृष्णाचे प्रेत आणि दुचाकी नदीपात्रात आढळली होती. याप्रकरणी एमआयडीसी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पुरात दुचाकीसह वाहून गेल्याने कृष्णाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली होती. दरम्यान याप्रकरणी मृताचा भाऊ संजय याने भावाच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करणारे पत्र गुन्हे शाखा निरीक्षक यांना दीड महिन्यापूर्वी पाठविले होते.याप्रकरणी पो. नि. शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, नस्सीम पठाण, कर्मचारी समद पठाण, प्रदीप शिंदे, रमेश भालेराव, संदीप बीडकर, भावलाल चव्हाण, रितेश जाधव यांनी आरोपीला पकडले.मृताच्या भावाचा संशय ठरला खरामृत कृष्णा कोरडे याचा भाऊ संजय कोरडे यांनी ३० आॅक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कृष्णाचा मृत्यू नैैसर्गिक नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला होता. घटनेच्या दिवशी आरोपी नारायणने कृष्णाला जेवण करण्यासाठी सोबत नेले होते. दुसºया दिवशी त्याचे प्रेत सापडले. मात्र नारायण कृष्णा कोरडे यांच्या अंत्यविधीला आला नाही आणि त्याच्या घरीही गेला नव्हता. त्याच्याविषयी त्यांनी संशय व्यक्त केला होता.तांत्रिक पुराव्याची झाली मदतपोलिसांनी घटनेच्या दिवशी संशयित आणि मृताच्या मोबाईल कॉल डिटेल्सची माहिती काढली. शिवाय शवविच्छेदन अहवाल वाचला. तेव्हा मृताच्या डोक्यात गंभीर घाव मारल्याने समोर आले. मृताच्या शरीरावर अन्य वरखडाही नव्हता. कृष्णाची हत्या करून तीन महिने उलटल्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत येतील, अशी कोणतीही शंका मनात नसलेला नारायण बिनधास्त वावरत होता. पोलिसांनी संशयावरून नारायणला ताब्यात घेतले तेव्हा तो या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचा बनाव करू लागला. पोलिसांनी त्यास विश्वासात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि अन्य तीन मित्रांच्या मदतीने कट रचून कृष्णाची हत्या केल्याचे सांगितले. नंतर अन्य आरोपींना पोलिसांनी उचलले.