शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंच्या दौऱ्यानंतरच ‘भाई-दादा’ गिरीवर निर्णय

By admin | Updated: April 23, 2016 01:22 IST

औरंगाबाद : शिवसेनेत पहिल्या फळीविरोधात दुसऱ्या फळीचे राजकारण पेटले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मे महिन्यात मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत.

औरंगाबाद : शिवसेनेत पहिल्या फळीविरोधात दुसऱ्या फळीचे राजकारण पेटले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मे महिन्यात मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. त्या दौऱ्यानंतरच सेनेतील ‘भाई-दादा’गिरीचे राजकारण संपुष्टात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सभागृह नेता राजेंद्र जंजाळ आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्यात हात-पाय तोडण्याची भाषा दोन दिवसांपासून सुरू आहे. दोघांच्या कृतीचे समर्थन करण्यात अर्थ नाही. कोण बरोबर, कोण चूक हे तपासणे अवघड होऊन बसले आहे. परंतु खैरेंकडून असे होणे अपेक्षित नव्हते. हे प्रकरण खालच्या पातळीवर गेले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आहे. हात-पाय तोडण्याची भाषा पक्षचौकटीच्या बाहेरची आहे, असे एका मुंबईतील नेत्याने लोकमतशी बोलताना सांगितले. पक्षात पहिल्यांदाच अशा बेशिस्तीने कळस गाठलेला नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असतानाच पालकमंत्री रामदास कदम विरुद्ध खैरे आणि आता त्यात सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांची भर पडल्यामुळे सेनेतील राजकारण ढवळून निघाले आहे. वरिष्ठ पदाधिकारी, नेते मंडळी अशा पद्धतीने अधिकारशाहीसाठी भांडत असतील तर खालच्या पातळीवरील पदाधिकारी कोणत्या थरावर असतील, यावरून शिवसेनेच्या वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.ठाकरे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची मातोश्रीवर शिवजलक्रांती मोहिमेच्या अनुषंगाने बैठक घेतली. २ ते १२ मेदरम्यान कधीही ठाकरेंचा मराठवाडा दौरा निश्चित होईल. लातूरपासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. दौऱ्यानंतर सेनेतील दुफळीचा शेवट होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. संपर्कप्रमुख म्हणाले.....संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, खैरे विरुद्ध जंजाळ हे प्रकरण मातोश्रीवर गांभीर्याने घेतले गेले आहे. पक्षप्रमुखच या प्रकरणात निर्णय घेतील. माझ्या पातळीवरचा हा विषय नाही.