शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजीनाम्यानंतरही सेनेत शांतताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:04 IST

शिवसेनेचे नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, महानगराध्यक्ष बाळू खोमणे माजी विरोधी पक्षनेत्यासह चार नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपात प्रवेश केला आहे़ या सर्व राजकीय उलथापालथीनंतरही सेनेमधून मागील चार दिवसात कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शिवसेनेचे नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, महानगराध्यक्ष बाळू खोमणे माजी विरोधी पक्षनेत्यासह चार नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपात प्रवेश केला आहे़ या सर्व राजकीय उलथापालथीनंतरही सेनेमधून मागील चार दिवसात कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्यामुळे नांदेडमध्ये सेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. या पक्षांनीही अद्याप आपले पत्ते उघड केले नाही.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची चर्चा मागील दोन महिन्यापासून सुरू आहे. भाजपाने दहा नगरसेवकांना आपल्याकडे खेचून घेत पक्षाचे दरवाजे उघडले आहेत. आणखीही काही नावे पुढे येत आहेत. त्याचवेळी आक्रमक पक्ष म्हणून ओळखल्या गेलेल्या शिवसेनेला नांदेडमध्ये मोठी घरघर लागल्याचेच दिसत आहे. जिल्हा प्रमुख, महानगराध्यक्ष यांच्यासह चार नगरसेवकांनी पक्ष त्याग करीत जाहीररित्या भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्व उलथापालथीत शिवसेनेचे स्थानिक आमदार हेमंत पाटील यांच्यावरच जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख, महानगराध्यक्ष बाळू खोमणे, माजी विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत यांनी व तसेच अन्य तीन नगरसेवकांनीही आरोप केले आहेत. नांदेडमध्ये शिवसैनिकांना न्याय मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. आ. पाटील हे कार्यकर्त्यांना मोठे होऊ देत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सेनेतील यासर्व घडामोडीबाबत पक्षाच्या वरिष्ठांना माहिती दिली होती़ मात्र त्याची दखल घेतली नाही़ काँग्रेसच्या इशाºयावरच सेना काम करीत असल्याचे आरोपही झाले. पदाधिकारी व नगरसेवकांनी सेनेच्या आमदारावर केलेले आरोप तसेच पक्ष सोडणाºयांबाबत कोणतीही प्रतिक्रिया ना आमदार हेमंत पाटील यांनी दिली ना कोणत्या अन्य पदाधिकाºयांनी दिली. पक्ष सोडणाºयांना सेनेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागते. हा सेनेचा इतिहास आहे. नांदेड मात्र त्यास अपवाद ठरले आहे. त्यानंतर सेनेचे नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांच्या बैठका, धावते मेळावे घेण्यात आले होते. या मेळाव्यातही अप्रत्यक्षरित्या पक्षांतरांची चर्चा घडवून आणणाºयांना धडा शिकवण्याची सुतोवाच नेत्यांसह स्थानिक आमदारांनी केले होती. मात्र प्रत्यक्षात जिल्हा प्रमुखांसह नगरसेवकांनी राजीनामे सादर केले आणि भाजपात प्रवेशही घेतला. मात्र या सर्व घडामोडीनंतरही कोणतीही प्रतिक्रिया अद्याप उमटली नाही. असाच प्रकार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बाबतीतही घडला आहे.