शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जागेची एनओसी दिल्यानंतरही औरंगाबादचे ‘आयुष’ रुग्णालय कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:53 IST

शासनाकडून मराठवाड्याला पुन्हा एकदा  वटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.  

ठळक मुद्देइतर जिल्ह्यांत मान्यता व निधीही मिळाला वर्षभरात रुग्णालयाच्या उभारणीच्या दृष्टीने काहीही कार्यवाही नाही.

औरंगाबाद :  घाटी रुग्णालयात जागा पाहिल्यानंतर शासनाला आयुष रुग्णालयाचा विसर पडला आहे. वर्षभरात रुग्णालयाच्या उभारणीच्या दृष्टीने काहीही कार्यवाही झालेली नाही. तुलनेत उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील आयुष रुग्णालयाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे शासनाकडून मराठवाड्याला पुन्हा एकदा  वटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.  

केंद्र शासनाने आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी या प्राचीन चिकित्सा पद्धतींना चालना देण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. या मंत्रालयामार्फत देशभर आयुष रुग्णालये उभारण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयांतर्गत शहरात ५० खाटांचे आयुष रुग्णालय उभारले जाणार आहे. यासाठी आयुष मंत्रालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (घाटी) ११ मे २०१७ रोजी जागा मागितली होती. 

जागा मागणीच्या ९ महिन्यांनंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये घाटीतील मेडिसीन विभागासमोरील जागा देण्याची तयारी घाटी प्रशासनाने दर्शविली. जागा उपलब्ध असल्याची माहितीही शासनाला कळविली. परंतु त्यानंतर प्रत्यक्ष आयुष रुग्णालयाच्या उभारणीसाठी काहीही हालचाली झालेल्या नाही.

औरंगाबादेत एकीकडे आयुष रुग्णालय उभारणीची नुसतीच चर्चा असताना दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आयुष रुग्णालय उभारणीला गती देण्यात आहे. राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत पुणे, नंदुरबार, अहमदनगर, सिंधुदुर्ग येथील आयुष रुग्णालयाच्या बांधकामासाठी १७ डिसेंबर रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

प्रत्येकी ८.९९ कोटी रुपयांच्या निधीपैकी २०१७-१८ या वर्षासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. विकासकामांसाठी नेहमीच मराठवाड्याला वगळले जाते. वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. आयुष रुग्णालयाच्या बाबतीतही ही परिस्थिती पाहायला मिळते आहे. त्यामुळे जागा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतरही औरंगाबादचे आयुष रुग्णालय अद्यापही कागदावरच आहे.

जागेची एनओसीआयुष रुग्णालयासाठी घाटीतील मेडिसीन विभागासमोरील जागा उपलब्ध असल्याची माहिती शासनाला कळविण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात जागेची एनओसीदेखील देण्यात आलेली आहे, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीhospitalहॉस्पिटलCentral Governmentकेंद्र सरकार