शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा खून करून प्रेत तलावात फेकले

By admin | Updated: April 1, 2016 01:03 IST

तामलवाडी : तीस वर्षीय अपंग महिलेचा गळा दाबून खून करून तिचे प्रेत एका पोत्यात बांधून तलावात टाकून दिल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सांगवी-माळुंब्रा तलावात गुरूवारी सकाळी उघडकीस आली.

तामलवाडी : तीस वर्षीय अपंग महिलेचा गळा दाबून खून करून तिचे प्रेत एका पोत्यात बांधून तलावात टाकून दिल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सांगवी-माळुंब्रा तलावात गुरूवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.उजव्या हाताने अपंग असलेल्या या महिलेचे प्रेत एक पोत्यात घालून तसेच या पोत्यात दगड भरून ते या तलावात टाकून देण्यात आले होते. गुरूवारी सकाळी पाण्यावर हे प्रेत पोत्यासह तरंगत असताना आढळून आल्यानंतर गोंधळवाडी येथील होमगार्ड नवानथ पांडुरंग दुधाळ यांनी तातडीने तामलवाडी पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. घटना समजताच सपोनि मिर्झा बेग, पोउपनि सुरेश शिंदे, तानाजी माने, जयराम राठोड, पद्मभूषण गायकवाड, राजेंद्रसिंह ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून प्रेत पोत्यासह पाण्याबाहेर काढले असता आत चार मोठे दगड आढळून आले. या महिलेच्या अंगावर काळ्या रंगाचा बुरखा, उजवा हात अपंग व हातात मनगटी घड्याळ असल्याचेही निदशनास आले. याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनि मिर्झा बेग करीत आहेत. या घटनेमुळे तामलवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शासन परिपत्रकानुसार खुनाच्या गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी पंच म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना घेतले जाते. गुरूवारी सांगवी-माळुंब्रा तलावात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पंचनामा करण्यासाठी बीट अंमलदार जयराम राठोड, राजाभाऊ ठाकूर हे माळुंब्रा जि. प. शाळेत दोन शिक्षकांना बोलाविण्यासाठी गेले होते. परंतु, प्रभारी मुख्याध्यापक संजय गोरे यांनी पंच म्हणून शिक्षकांना पाठविण्यास नकार दिला. यानंतर सांगवी (काटी) जि. प. शाळेतील मुख्याध्यापिका छाया जोशी यांनी दोघा शिक्षकांना पाठविल्यानंतर दुपारी बारा वाजता पंचनामा करण्यात आला. (वार्ताहर)