शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात खून करून प्रेत नांदेडमध्ये आणून टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:36 IST

काम लावतो म्हणून घेऊन गेलेल्या जुन्या नांदेडातील चौफाळा भागातील एका आठ वर्षीय बालकाचा मालेगाव (जि़नाशिक) येथे खून करून प्रेत भावेश्वर नगर नांदेड येथे आणून टाकल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली़

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड: काम लावतो म्हणून घेऊन गेलेल्या जुन्या नांदेडातील चौफाळा भागातील एका आठ वर्षीय बालकाचा मालेगाव (जि़नाशिक) येथे खून करून प्रेत भावेश्वर नगर नांदेड येथे आणून टाकल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली़पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या चौफाळा भागातील शेख शाहीद शेख जिलानी या ८ वर्षीय बालकास काम लावतो म्हणून नजीमाबाद मालेगाव जि़ नाशिक येथील सईदा शफीक खान पठाण व शफीक खान हबीबखान पठाण हे त्यांच्या घरी घेवून गेले़ त्यांनी संगनमत करून शेख शाहीद यास नजीमाबाद मालेगाव येथे नेवून भीक मागण्यास भाग पाडले़ त्याला सतत मारहाण करून त्याच्या शरीरावर चटके दिले व त्यास जाळून ठार केले, असा आरोप शेख शाहीदची आई शेख जरीना शे़जिलानी यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात ९ नोव्हेेंबर रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलिस ठाणे अंमलदार रमेश राठोड व मदतनीस पोक़ॉ़ ज्ञानोबा कवठेकर यांनी दिली़ विशेष बाब म्हणजे उपरोल्लेखीत आरोपींनी त्यांच्या नजीमाबाद मालेगाव येथे ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत आपला मुलगा शेख शाहीदचा खून करून त्याचे प्रेत भावेश्वरनगर नांदेड येथील रशीद खान यांच्या घरी आणून टाकले असल्याचा आरोपही मयत बालकाची आई शेख जरीना यांनी त्यांच्या तक्रारीद्वारे केला आहे़घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी फसके, स़पो़नि़ घाटे व पोउपनि़ राजेश जाधव आदींनी प्रेताची पाहणी केली़ ही घटना मालेगाव येथे घडल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी कागदपत्रे संबंधित पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली़