शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘इंदिरा’ उठावानंतर जातीय राजकारणाला वाढता पाठिंबा’

By admin | Updated: April 23, 2016 01:19 IST

औरंगाबाद : जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील ‘इंदिरा गांधी उठावानंतर’ या देशातील राजकारणात जातीयवादी पक्षांचा शिरकाव झाला आणि या जातीय राजकारणाला पाठिंबा मिळत गेला.

औरंगाबाद : जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील ‘इंदिरा गांधी उठावानंतर’ या देशातील राजकारणात जातीयवादी पक्षांचा शिरकाव झाला आणि या जातीय राजकारणाला पाठिंबा मिळत गेला. आता तर हे राजकारण या देशात राज्यघटना वगैरे काही आहे याची पर्वा न करता सुरू आहे. ‘मनुस्मृती’ प्रमाण मानून सुरू असलेले हे राजकारण देशाला फॅसिझमकडे नेत आहे, असा स्पष्ट आरोप आज येथे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी केला. मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात अ‍ॅड. भगवानराव देशपांडेलिखित ‘विचारमंथन’ या ग्रंथाच्या विमोचनप्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांनी या ग्रंथाच्या अनुषंगाने जगभरातील बदलांचा वेध घेत भाष्य केले. सावंत म्हणाले की, हिटलर हाच यांचा नायक आहे. तोच मार्ग पत्करून या देशात फॅसिझम आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्माच्या मार्गाने फॅसिझम येईल, असे भाकीत पं. नेहरू यांनी केले होते. ते इतक्या लवकर येईल, असे वाटले नव्हते. दुर्दैवाने या फॅसिझमचा मुकाबला करण्यासाठी आशास्थान नाही. डाव्या चळवळीतील मंडळी भांडवलशाहीचे गोडवे गात आहे. विरोधी शक्तीला आज नेतृत्व नाही. कन्हैयाच्या रूपाने तरुणांमध्ये उत्साह निर्माण होत आहे. अमेरिकेतसुद्धा लोकशाही नाही. तेथील लोकशाहीचे रूपांतर धनिकशाहीत झाले आहे. भारतातसुद्धा ८२ टक्के खासदार धनिक आहेत. १८२ खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. म्हणजे निवडून येण्यासाठी एकतर धनिक असावे लागते, नाही तर गुंड असावे लागते, असाच याचा अर्थ झाला. मागच्या लोकसभा निवडणुकीत २३ हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे एका अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.राज्यसभा तर श्रीमंतांचा क्लब (अड्डा) झाला आहे. नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशी पळून गेलेला विजय मल्ल्या हा राज्यसभेचा सदस्य आहे, याकडे सावंत यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रारंभी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. भालचंद्र कांगो, जयश्री गायकवाड, उदय बोपशेट्टी, उषा देशपांडे, कॉ. प्रकाश बनसोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जयश्री सावंत, शारदा साठे यांची मंचावर उपस्थिती होती. अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कॉ. राम बाहेती यांनी सूत्रसंचालन केले, तर कॉ. भास्कर लहाने यांनी आभार मानले.सरकारला धर्मनिरपेक्षता मान्य नाही...आमचे संविधान म्हणजे लोकशाही, समाजवाद निर्माण करण्याचा जाहीरनामा होय आणि हा जाहीरनामा सर्वांवर बंधनकारक आहे. लोकशाही टिकविण्यासाठी जात, धर्म, वंश, भाषा, लिंग, असा भेदाभेद चालत नाही. आजच्या सरकारला समाजवाद व धर्मनिरपेक्षता मान्यच नाही. देशात घटनाच नाही या पद्धतीने ते कारभार करीत आहेत. घटनेची पायमल्ली करूनच महाराष्ट्रातील सरकार कारभार करीत आहे. आवाजी मतदानाने कधीही विश्वासदर्शक ठराव संमत होत नसतो. या सरकारने अजूनही कायद्याच्या चौकटीत राहून विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतला नाही. केंद्र सरकारच्या व्यापारी व संरक्षण करारांमुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येत आहे. ४भारत देश भांडवलशाही अमेरिकेची वसाहत बनत आहे. हा देश फक्त एका धर्मीयांचा आहे असे ‘यांना’ वाटत आहे. त्यामुळे इतर धर्मीयांवर हल्ले वाढले आहेत, असेही यावेळी पी. बी. सावंत यांनी नमूद केले.