शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अतिप्रसंगानंतर मुलीला फेकले कोरड्या विहिरीत

By admin | Updated: January 15, 2017 22:59 IST

गेवराई : शहराजवळील बेलगाव शिवारात एका ११ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून एका नराधमाने तिला कोरड्या विहिरीत फेकून दिले

गेवराई : शहराजवळील बेलगाव शिवारात एका ११ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून एका नराधमाने तिला कोरड्या विहिरीत फेकून दिले. ही खळबळजनक घटना शनिवारी घडली. मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.बेलगाव शिवारातील एका खाजगी कापूस जिनिंगजवळ पीडित मुलगी वास्तव्यास आहे. शनिवारी नातेवाईक कामावर गेले होते. त्यामुळे घरी ती एकटीच होती. भारत भगवान गव्हाणे (रा. गोपाळवस्ती, ता. गेवराई) हा तेथे आला. ‘तुझ्या आईने माझ्यासोबत सरपण आणण्यासाठी जायला सांगितले आहे, असे सांगून त्याने तिला जिनिंगच्या पाठीमागे नेले. शेतामध्ये आडोशाला नेऊन त्याने तुला माझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड करीत तेथून पळ काढला, तेव्हा भारतने तिचा पाठलाग करून तिला पकडले. तिचा गळा दाबून हात पिरगळत मारहाण केली. याबाबत कोणाला सांगितले तर तुला जिवे मारीन, अशी टोकाची धमकी देत त्याने तिला उचलून जवळच्या विहिरीत फेकले.दरम्यान, कामावरून परतल्यानंतर कुटुंबियांना मुलगी दिसली नाही. त्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. विहिरीतून रडण्याचा आवाज आल्यानंतर त्या दिशेने नातेवाईक गेले, तेव्हा मुलगी त्यात आढळून आली. तिला बाहेर काढून नातेवाईकांनी गेवराई ठाणे गाठले. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. (वार्ताहर)