शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पित्यानंतर लेकीचाही सन्मान !

By admin | Updated: October 30, 2014 00:28 IST

प्रताप नलावडे ,बीड राज्याच्या मंत्रीमंडळात पंकजा मुंडे यांचा सामावेश जवळपास निश्चित मानला जात असून जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी असेल,

प्रताप नलावडे ,बीडराज्याच्या मंत्रीमंडळात पंकजा मुंडे यांचा सामावेश जवळपास निश्चित मानला जात असून जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी असेल, याची उत्सुकता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आजवर त्यांचे नाव होते. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे पंकजा यांच्याकडे महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात येईल, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बोलताना व्यक्त केला.गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी पक्षात आपले स्वत:चे स्थान निर्माण केले असून पक्षीय पातळीवरही त्यांच्या निवडणुकीतील कामगिरीची दखल घेतली जाईल, या विश्वासाने जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शपथविधीसाठी मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातून मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार असल्याचेही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा आता पंकजा सांभाळत आहेत. पुन्हा संघर्ष यात्रा काढून त्यांनी पक्षीय पातळीवरही निर्णयात्मक कामगिरी बाजवली आहे.जिल्ह्यातील भाजपाचा एकहाती विजय पंकजा यांनीच मिळविला. त्यांचा कॅबिनेटमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर जिल्ह्याला पाचव्यांदा कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. यापूर्वी स्वत: मुंडे यांच्यासह जयदत्त क्षीरसागर, सुंदरराव सोळंके, आणि विमल मुंदडा यांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. शिवाय मुंदडा यांच्यानंतर त्या जिल्ह्यातील दुसऱ्या महिला मंत्री ठरतील. ओबीसीचे नेतृत्व आता त्यांच्याकडे आले आहे. आपल्या सोबत ओबीसी समाज असल्याचे त्यांनी विधानसभा निवडणुकीतही दाखवून दिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर निर्माण झालेली पोकळीही त्यांनी भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अनुकंपा तत्वाने राजकारणात कोणतेही पद आपल्याला नको आहे, असे सांगत पंकजा यांनी स्वत:चे नेतृत्व सिध्द केल्यामुळे त्यांचा मंत्रीमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे. गोपीनाथ मुंडे यांनी कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. जिल्ह्याचे राजकारणही त्यांच्या भोवतीच कायम फिरत राहिले होते. पंकजा यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांना हे आव्हानही पेलावे लागणार आहे.वारसा, सहानुभुती, पक्षातील त्यांचे स्थान, ओबीसीचे नेतृत्व अशा अनेक बाबी त्यांच्यासाठी सकारात्मक आहेत. आता जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे ती केवळ त्यांच्याकडे दिल्या जाणाऱ्या खात्याची. गेवराईमध्ये दोन विद्यमान आमदारांना टक्कर देऊन विधानसभेत धडक मारणाऱ्या भाजपाच्या अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांच्याकडेही पक्ष मोठी जबाबदारी सोपू शकतो, अशी दाट शक्यता आहे़अ‍ॅड़ पवार हे अडीच वर्षांपूर्वी भाजपात डेरेदाखल झालेले आहेत़ अडचणीच्या काळात त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांना मोलाची मदत केलेली आहे़ गेवराई नगर पालिकेवर ‘होल्ड’ असलेल्या अ‍ॅड़ पवार यांचे वडील माधवराव पवार हे एकेकाळी आमदार होते़ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे बदामराव पंडित यांच्याशी त्यांची लढाई झाली़ अमरसिंह पंडित हे बदामरावांच्या सोबत होते़ पालिका वगळता इतर सर्व सत्तास्थाने ताब्यात असलेल्या दोन्ही पंडितांना पराभवाची धूळ चारून अ‍ॅड़ पवार विक्रमी मतांनी निवडून गेले़ सुमारे ६० हजार १ मतांनी त्यांनी आमदारकीवर स्वत:चे नाव कोरले़ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मते घेऊन विधानसभेत जाण्याचा मान त्यांनाच मिळाला आहे़ त्यामुळे पक्षाकडून त्यांना राज्यमंत्रिमंडळात संधी मिळू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे़ गेवराई तालुक्यात या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे़ दरम्यान, कालपर्यंत आष्टीचे आमदार भीमराव धोंडे यांचे नावही चर्चेत होते़ मात्र आता पवारांचे नाव पुढे आले आहे़