शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मार्चनंतर शेतकऱ्यांची कापणार वीज

By admin | Updated: December 11, 2014 00:47 IST

नजीर शेख, औरंगाबाद मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार के ला आहे.

नजीर शेख, औरंगाबादसत्तेत नसताना शेतकऱ्यांचे कृषी बिल पूर्णपणे माफ करा म्हणणाऱ्या आताच्या सत्ताधाऱ्यांनी मार्चपर्यंत कृषी वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा देऊन मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार के ला आहे. राज्याचे नवे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे मार्चनंतर कृषी कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीनंतरही शेतकऱ्यांना कृषी वीज बिल माफ केले जाणार नाही; मात्र थकबाकी असली तरी वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती दिली जाईल, तसेच वीज बिल भरताना ३३ टक्के सवलतही दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फ डणवीस यांनी औरंगाबादेत मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर मोर्चा काढून शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज आणि कृषी वीज बिल माफ करावे, अशी मागणी केली होती; मात्र आता सत्तेत आल्यावर त्याचा विसर पडल्याचे चित्र आहे.कृषी विजेचे कनेक्शन कापणार नसल्याचे याआधी शासनाने जाहीर करून काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र ऊर्जामंत्र्यांनी विज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांना मार्चनंतर विजेचे कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. राज्यामध्ये मराठवाड्यात दुष्काळाचे तीव्र संकट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना एकीकडे बँकांनी व्याज भरण्याचा तगादा लावला आहे. अनेक शेतकरी पीक वाया गेल्याने कर्ज तर दूरच राहिले व्याजही भरू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांकडे जूनपासून किंवा काहींकडे गारपीट झाल्यानंतर फे ब्रुवारी महिन्यापासूनचे वीज बिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांना आता आगामी खरीप हंगाम चांगला गेल्यासच काही प्रमाणात कर्जफेड किंवा वीज बिल भरणे शक्य होणार आहे. ही परिस्थिती राज्य सरकारमधील मंत्री, तसेच सत्तारूढ आमदारांनाही चांगली माहीत आहे. अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखविण्याचे शासनाचे धोरण दिसत नसून उलट त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.