शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निकाल लागताच तिने स्वत:ला घेतले कोंडून

By admin | Updated: June 14, 2017 00:38 IST

औरंगाबाद : दहावीचा निकाल लागला आणि तिने आॅनलाइन गुण पाहिले... ९१ टक्के गुण तिला मिळाले... तिने आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे होता; पण तिने स्वत:ला घराच्या खोलीत कोंडून घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दहावीचा निकाल लागला आणि तिने आॅनलाइन गुण पाहिले... ९१ टक्के गुण तिला मिळाले... तिने आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे होता; पण तिने स्वत:ला घराच्या खोलीत कोंडून घेतले. कारण, तिच्या आई-वडिलांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळावेत, अशी अपेक्षा होती; पण तिने ती पूर्ण केली नाही. आता माझे आई-बाबा मला खूप बोलतील. शाब्दिक छळ करतील, पदोपदी अपमान करतील. आता पुढील जगणे मुश्कील होईल, या भीतीने त्या मुलीने स्वत:ला कोंडून घेतले. गारखेडा परिसरातील तपस्या (नाव बदलले आहे.) ही मुलगी अभ्यासात हुशार. तिचे आई-वडील दोघेही इंजिनिअर. त्यांना आपल्या मुलीने दहावीच्या परीक्षेत कमीत कमी ९५ टक्के गुण मिळावेत, अशी अपेक्षा होती. आपली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते तपस्यावर सतत दबाव आणत होते. तिने अभ्यासातच लक्ष घालावे, यासाठी तिला सतत बोलत होते. तपस्या मैत्रिणीसोबत थोडा वेळ फिरायला गेली की, मैत्रिणीसमोर तिचा अपमान करीत, नातेवाईकांसमोर पदोपदी अपमानही करीत होते. हा मानसिक छळ व अपेक्षांचा तिच्यावर ताण आला होता. निकालाच्या आदल्या दिवशी तिची आई तिला म्हणाली होती की, काय परीक्षेत बोंब पाडते कोणास ठाऊक... कमी गुण मिळाले, तर आई-वडील काय बोलतील, या भीतीने तिला रात्रभर झोप आलीच नाही... आज सकाळपासून तिने जेवणही केले नाही. दुपारी आॅनलाइन निकाल जाहीर झाला. तिला ९१ टक्के गुण मिळाले. त्याचवेळी वडिलांचा आॅफिसमधून आईच्या मोबाइलवर मेसेज आला ‘मला माहीतच होते ही समाजात आपले नाक कापणार आणि तसेच झाले.’ आईने हा मेसेज तपस्याला वाचून दाखविला. ९१ टक्के गुण मिळविल्याच्या आनंदाऐवजी घरात मातम सुरू झाला. वडिलांच्या भीतीने तपस्याने स्वत:ला घरातील एका खोलीत कोंडून घेतले. तिच्या आईने मानसोपचारतज्ज्ञांना फोन लावला व म्हणाली की, ९१ टक्के म्हणजे काय मार्क आहेत का, आमच्या मुलीने आमचे नाक कापले, तिच्यासाठी आम्ही वर्षभर अनेक गोष्टींचा त्याग केला. तिच्यासाठी मी नोकरी सोडून माझे करिअर पणाला लावले.तिला आवडते ते वेळेवर खाऊ घातले; पण अखेर आमची भीती खरी ठरली... आता बारावीत काय बोंब पाडते कोणास ठाऊक... आता खोली बंद करून तोंड (पान ३ वर)