शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

चार दिवसांनंतर एसटी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:07 IST

: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला संप अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागे घेतला आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला संप अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागे घेतला आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (दि.२१) पहाटे ४ वाजेपासून बससेवा सुरळीत झाली. तब्बल चार दिवसांनंतर एसटी बसस्थानकाबाहेर पडून रस्त्यावर धावली. मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक सकाळपासूनच प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेल्याचे पाहायला मिळाले.एसटी महामंडळातील कर्मचा-यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी १७ आॅक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला. तब्बल चार दिवस हा संप चालला. संपाला कर्मचा-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या चार दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यातील बसस्थानकांतून एकही बस रस्त्यावर आली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अखेर शुक्रवारी रात्री उशिरा संप मागे घेण्यात आला.संप मागे घेण्यात आल्याची माहिती मिळताच रात्री उशिरा औरंगाबाद विभागातील सर्व आगार व्यवस्थापकांना बससेवा सुरू करण्याचे नियोजन करावे,अशी सूचना महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी केल्या. सूचनेनुसार वायुवेगाने घडामोडी घडत पहाटे ४ वाजेपासून विभागातील बससेवा सुरू करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम मध्यवर्ती बसस्थानकातून औरंगाबाद-सोलापूर, औरंगाबाद-पुणे बस बाहेर पडल्या. त्यानंतर इतर मार्गांवरील बससेवा सुरू झाल्या. चार दिवसांपासून ओस पडलेले मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक शनिवारी प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले. दोन्ही बसस्थानकांत विविध ठिकाणी जाणाºया प्रवाशांची दिवसभर गर्दी दिसून आली.गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एसटी बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांच्या चेह-यावरही आनंदाची लकेर पाहायला मिळाली. बससेवा सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याच्या भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या. पाचव्या दिवशीही संप चालू राहील, या अपेक्षेने खाजगी वाहतूकदारांनी गर्दीच्या मार्गावर अधिक वाहने सज्ज ठेवली होती; परंतु त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले.