शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाडा विद्यापीठाला प्रकुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:02 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची निवड झाली. मुलाखतीचा सोपस्कार पार पडल्यानंतर तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी ही निवड जाहीर केली.

ठळक मुद्देउद्या घेणार पदभार : अशोक तेजनकर यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची निवड झाली. मुलाखतीचा सोपस्कार पार पडल्यानंतर तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी ही निवड जाहीर केली.या निवडीचे पत्र शुक्रवारी सायंकाळी त्यांना प्राप्त झाले. डॉ. तेजनकर हे सोमवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता पदभार घेणार आहेत.कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रकुलगुरूपदासाठी डॉ. अशोक तेजनकर, विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी. जे. हिवरे आणि लातूर येथील दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांच्या नावाची शिफारस केली होती. राज्यपालांनी तिघांच्या मुलाखती २७ सप्टेंबर २०१७ रोजी राजभवनात घेतल्या. यानंतर दोन दिवसांत नेमणूक होण्याची शक्यता होती. मात्र, यासाठी तब्बल २३ फेब्रुवारीचा दिवस उजाडला. पाच महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विद्यापीठाचे पहिले प्रकुलगुरू म्हणून डॉ. अशोक तेजनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.डॉ. तेजनकर यांना शिक्षण, प्रशासन, भूगर्भ संशोधन क्षेत्रात २८ वर्षांचा अनुभव आहे. पाण्याच्या क्षेत्रातील विविध संशोधन प्रकल्प, भारत सरकारच्या स्कील इंडिया प्रकल्प, महाराष्ट्र-इस्रायल जलनियोजन समितीवर उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. याशिवाय तेजनकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ६२ संशोधन पेपर सादर केले आहेत. त्यांचे ९ ग्रंथ प्रकाशित आहेत.विद्यापीठाच्या पहिल्या प्रकुलगुरूपदी निवड ही आनंदाची बाब आहे. विद्यार्थी, गुणवत्ता, कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या हिताला प्राधान्य असेल. कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाचा विकासरूपी गाढा पुढे घेऊन जायचा आहे.- डॉ. अशोक तेजनकर, नवनियुक्त प्रकुलगुरू