शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भांडणानंतर पती मुलाचा मृतदेह घेऊन परतला

By admin | Updated: October 12, 2016 01:17 IST

लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद): पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पोटच्या चार वर्षांच्या मुलाला देवदर्शन करण्यासाठी घेऊन घराबाहेर पडलेला पती काही तासांनंतर

लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद): पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पोटच्या चार वर्षांच्या मुलाला देवदर्शन करण्यासाठी घेऊन घराबाहेर पडलेला पती काही तासांनंतर परतला तो रेल्वेखाली चिरडून मृत झालेल्या मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह घेऊनच. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी मध्यरात्री अकरा वाजेदरम्यान गंगापूर तालुक्यातील भानवाडी शिवारात घडली. मुलाचा खून झाला की, अपघात याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे.मधुकर दगडू वानखेडे (२८) हा पत्नी पुष्पा (२५) मुलगी रूपाली (६) व मुलगा ओम (४) यांच्यासोबत भानवाडी येथे राहतो. मधुकर दारूच्या नशेत पुष्पाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत सतत भांडण करीत असे. सोमवारीदेखील मधुकरने पुष्पासोबत भांडण केले. त्यानंतर रागाच्या भरात मुलगा ओम यास देवी दाक्षायणी मातेचे दर्शन करून आणतो असे म्हणून घराबाहेर घेऊन गेला.त्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मधुकर घरी एकटाच परतला. पत्नीने मुलगा कुठे आहे अशी विचारणा करताच त्याने रेल्वे रूळावरून आम्ही घरी येताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या रेल्वेमुळे मी गडबडलो व ओम रेल्वेखाली पडल्याचे सांगितले. यानंतर पुष्पाने तात्काळ लासूर स्टेशन येथील पोलीस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली. जमादार अशोक गंगावणे यांना ग्रामस्थांनी रेल्वे रूळावर मुलगा मृत झाल्याची माहिती दिली.यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी शरद बरडे, सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, उपनिरीक्षक संदीप काळे, प्रशांत मुंडे, युनूस शेख, (पान २ वर)मधुकर व पुष्पाचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून सतत भांडणे होऊ लागली होती. त्यामुळे मधुकर पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता. ४सोमवारी रात्री झालेल्या भांडणानंतर दारूच्या नशेत मधुकर ओमला घेऊन रेल्वे रूळावरून जात होता. तेवढ्यात मनमाडकडून येणाऱ्या रेल्वेमुळे तो गडबडला व त्याच्या कडेवरील मुलगा खाली पडून रेल्वेखाली चिरडल्या गेला, असे शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले.दरम्यान, पत्नीसोबतच्या भांडणाचा राग म्हणून मधुकरने ओमचा खून केला की खरोखर अपघात झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. खरा प्रकार काय आहे, हे तपासानंतरच कळणार आहे; पण पोटचा गोळा गेल्याने माता हंबरडा फोडताना पाहून अनेकांचे हृदय हेलावले.