शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अकरा दिवसानंतरही खुनाचे कारण अस्पष्टच

By admin | Updated: January 15, 2017 01:14 IST

अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळेच दहा दिवस पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विलासकडून खुनामागचे नेमके कारण व इतर माहिती काढून घेण्यास पोलिसांना अपयश आल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. सुमित्रा होंडे यांची अंबड शहरातील राहत्या घरी पती सतीश होंडे यांच्या परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना २ जानेवारी रोजी उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. याचबरोबर त्यांनी घटनेच्या तपासावर सातत्याने लक्ष ठेवले. तपासाला गती मिळावी यासाठी त्यांनी या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनुने यांच्याकडे सोपविला. मात्र, तपास कामातील दिरंगाईचा फायदा घेत विलास होंडे याने पोलिस कोठडी संपेपर्यंत खुनाचे नेमके कारण पोलिसांना कळू दिले नाही. १८ वर्षे ३ महिने वय असणाऱ्या व कोणत्याही गुन्ह्याचे रेकॉर्ड नसणाऱ्या विलास होंडेसारख्या महाविद्यालयीन युवकाकडून खुनाचे नेमके कारण काढून घेण्यात पोलिस अपयशी ठरल्याने आता पोलिसांच्या कार्यपध्दतीवरतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. होंडे कुटुंबिय जिल्ह्यातील प्रतिष्ठितांपैकी एक असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विलासने खुनाची कबुली दिल्यानंतर तो खुनाची दररोज वेगवेगळी कारणे सांगायचा. शिवाय सुमित्रा होंडे यांचा नियोजनबध्द पध्दतीने केलेला खून एकटा विलास करु शकत नाही. याकामी त्याला नक्कीच आणखी कोणाचे तरी सहकार्य असले पाहिजे, असे मुद्दे उपस्थित करीत पोलिसांनी विलास हा तपासात सहकार्य करीत नसल्याने त्याची नार्कोटेस्ट करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही न्यायालयाकडे केली होती. मात्र, आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून, भल्या-भल्यांना बोलते करणारे पोलिस विलास होंडे याच्या बाबतीतच कमी कसे पडले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)