शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

समिती अध्यक्ष, सदस्य नागपूरला गेल्यामुळे अहवाल लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा मंगळवारीच (दि. १७) अहवाल देण्याचे बंधन असतानाही हा अहवाल विद्यापीठाला मिळू शकला नाही. समिती अध्यक्ष आणि एक सदस्य दुपारीच नागपूरला रवाना झाल्यामुळे चौकशीचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा मंगळवारीच (दि. १७) अहवाल देण्याचे बंधन असतानाही हा अहवाल विद्यापीठाला मिळू शकला नाही. समिती अध्यक्ष आणि एक सदस्य दुपारीच नागपूरला रवाना झाल्यामुळे चौकशीचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. आता समिती अध्यक्ष २० जुलै रोजी नागपूरहून परतल्यानंतरच यासंदर्भात निर्णय होईल.‘लोकमत’ने १४ जुलै रोजी उघडकीस आणलेल्या ‘नापास विद्यार्थ्यांना पदवी’ प्रमाणपत्र वाटप प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती दोनदिवसांत अहवाल देणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केलीहोती.या समितीने पहिल्या दिवशी कामकाज केले. दुसऱ्या दिवशी डॉ. सरवदे आणि सदस्य डॉ. मजहर फारुकी यांनी सकाळच्या सत्रात कामकाज केल्यानंतर ते दुपारी नागपूरला रवाना झाले. नागपूर येथे १८ व १९ जुलै रोजी राज्यभरातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्रकुलगुरू, अधिष्ठाता आणि कुलसचिवांची बैठक उच्चशिक्षण विभागाने आयोजित केली आहे. या बैठकीसाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्यासह चार अधिष्ठाता मंगळवारी दुपारीच रवाना झाले. यामुळे चौकशी अहवाल सादर करण्यासाठी शुक्रवारचा दिवस उजडणार असल्याचे स्पष्टझाले.या समितीचे अध्यक्ष व एक सदस्य नागपूरला गेल्यानंतर समितीचे सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत अनेक कर्मचारी, अधिका-यांचे इनकॉमेरा जबाब घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठfraudधोकेबाजी