शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महापौर उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये खदखद !

By admin | Updated: May 11, 2016 00:19 IST

दत्ता थोरे ल्ल लातूर महापौर अख्तर शेख यांचे महापौर पद गेल्यानंतर काँग्रेसने दीपक सूळ हा नवा चेहरा महापौरपदासाठी घोषित केला. रांगडे व्यक्तिमत्त्व,

दत्ता थोरे ल्ल लातूरमहापौर अख्तर शेख यांचे महापौर पद गेल्यानंतर काँग्रेसने दीपक सूळ हा नवा चेहरा महापौरपदासाठी घोषित केला. रांगडे व्यक्तिमत्त्व, प्रशासनावर वचक राहील असा कडक स्वभाव आणि तरुण रक्त असे मिश्रण म्हणून सूळ यांना संधी मिळाली असली तरी काँग्रेस श्रेष्ठींच्या या निर्णयामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून मात्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. यातील काहींनी श्रेष्ठींना आपली नाराजी बोलूनही दाखविली असून त्यांची समजूत घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा चालू आहे. अख्तर शेख यांच्यानंतर महापौर कोण ? हा काँग्रेससमोर प्रश्न होता. असगर पटेल, राम कोंबडे, महादेव बरुरे, विक्रांत गोजमगुंडे यांच्याबरोबर दीपक सूळ यांच्याही नावाची चर्चा होती. पण सूळ यांचे नाव फारसे आघाडीवर नव्हते. गेल्या चार वर्षांपासून पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा वचक हरविलेला होता. महापौर म्हणून गाडा हाकेल असा हुकमी एक्का दोन्ही महापौरांना पेलविता आला नव्हता. नेमकी हिच बाब हेरून श्रेष्ठींनी ऐनवेळी सारी नावे बाजूला ठेवून दीपक सूळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मात्र अनेकांनी भुवया उंचावल्या. ‘वचक’ या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मात्र चांगलीच अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. याची कारणेही तशीच आहेत. सूळ यांच्या नावाची घोषणा होताच सेनेच्या रवि सूडे यांनी ‘हा तर संजय सावंतांनी डोक्यावर ठेवलेला हात’ अशी दिलेली प्रतिक्रिया सर्वात बोलकी आहे. उमेदवारी घोषित व्हायच्या आधी काही दिवस शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे सूळ यांच्या घरी जाऊन ‘पाहुणचार’ घेऊन आले होते. याची दखल काँग्रेसने घेतली असा तर्क सुडे यांनी काढला. हा काही त्यांच्या एकट्याचा तर्क नाही. काँग्रेसमधील एका नगरसेवकांनेही नाव न छापण्याच्या अटीवर जर विरोधी पक्षांच्या संपर्कात राहील्याने पदे मिळणार असतील तर आम्हीही इथून तशीच निष्ठा ठेवावी का ? असा सवाल केला. हीच का श्रेष्ठींची निष्ठावंतांना फळे ? सूळ यांच्या गळ्यात घातलेली महापौर पदाची माळ हा काही पहिला धक्का देणारा निर्णय नाही. यापूर्वी विधानसभेच्या आधी देशमुखांच्या विरोधात माजी आमदार शिवाजीराव कव्हेकरांनी भूमिका मांडल्यानंतरही प्रतिभातार्इंना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले गेले. बब्रुवान काळे यांच्या निष्ठेवर शंका घ्यायला शिताचीही गरज नाही. पण जिभेचा दांडपट्टा हेच मोठे अस्त्र असलेले वैजनाथ दादा आमदार झाले. विमानतळाच्या मुद्यांवरुन पत्रकबाजी केल्यानंतरही डी. सी. देशमुख मांजराचे चेअरमन झाले. बाकीच्या जाऊद्या, पण खुद्द बाभळगावात काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात पंचायत समिती लढविल्यानंतरही १०० मताने पडलेल्या सतीश कुटवाडेंना गावचे सरपंच केले. मग सांगा निष्ठा कशाशी खातात ? असा सवाल एक निष्ठावंत काँग्रेस नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला. सूळ यांच्यापुढे अग्निदिव्य ! काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना मागे टाकून महापौर पदावर विराजमान होऊ पाहणाऱ्या दीपक सूळ यांच्यापुढे आता अग्निदिव्य आहे. लातूरचे प्रथम नागरिक होण्याचे भाग्य ही काही साधीसुदी गोष्ट नाही. शिवराज पाटील चाकूरकर, चंद्रशेखर बाजपेयी, जनार्दन वाघमारे, मन्मथअप्पा लोखंडे, प्रदीप राठी, व्यंकट बेद्रे, एस. आर. देशमुख, अबुबकर सिद्दीकी, विक्रम गोजमगुंडे अशा दिग्गज नेत्यांनी ही पदे भूषवून पदांचा मान वाढविला आहे. पक्षांतर्गत खदखद शांत करुन सर्वांना सोबत घेऊन पाण्याच्या संकटातून लातूरला बाहेर काढण्याचे दिव्य त्यांच्यासमोर आहे.