शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर शिक्षकांच्या लढ्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:59 IST

जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणारी अतिरिक्त (आगाऊ) वेतनवाढ २००९ मध्ये सहाव्या वेतन आयोगाचे निमित्त करून अचानक बंद करण्यात आली होती. या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्देश २८ आॅगस्ट रोजी न्यायालयाने शासनाला दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणारी अतिरिक्त (आगाऊ) वेतनवाढ २००९ मध्ये सहाव्या वेतन आयोगाचे निमित्त करून अचानक बंद करण्यात आली होती. या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्देश २८ आॅगस्ट रोजी न्यायालयाने शासनाला दिला.जिल्ह्यातील ५० पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एप्रिल २०१७ रोजी अ‍ॅड. शिवकुमार मठपती यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. २८ आॅगस्ट रोजी औरंगाबाद खंडपीठासमोर न्यायमूर्ती एस.एस. केमकर आणि न्यायमूर्ती एन. डब्ल्यू सांबरे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.सुनावणीवेळी १२ डिसेंबर २००० चे परिपत्रक अजूनही अस्तित्वात असून राज्य शासन व जिल्हा परिषदेचा उल्लेख जिल्हा शिक्षक पुरस्कार मंजुरी आदेशात करीत आहे. याचबरोबर राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना नागपूर व मुंबई खंडपीठाच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने २५ जानेवारी २०१७ रोजी शासन निर्णय काढून राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना २००५, २००६ ते २०१२- २०१३ पर्यंतच्या शिक्षकांना दोन वेतनवाढी दिल्या. त्यामुळे जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची वेतन वाढ बंद करणे चुकीचे असून त्यांच्यावर अन्याय होत असून त्या संबंधी शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. शिवकुमार मठपती यांनी केला. तसेच २००६ पासून २०१६-२०१७ पर्यंतच्या पुरस्कारप्राप्त याचिकाकर्त्यांची बाजू समक्षपणे न्यायालयासमोर मांडून त्यांना एक जादा वेतन वाढ देणे योग्य आहे, हे मांडले. यावेळी सुनावणीअंती याचिकाकर्त्या शिक्षकांचा प्रस्ताव हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वित्त विभाग आणि ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या सचिवाकडे पाठवावा आणि तो प्रस्ताव शासनाने १२ डिसेंबर २००० च्या परिपत्रकाच्या आधारे पुढील चार महिन्यात याचिकाकर्त्यांना एक आगाऊ वेतनवाढ द्यावी, असा निर्देश औरंगाबाद खंडपीठाने शासनाला दिला.जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुभाष जिरवणकर पांडुरंग गिरी, संजय भक्कड, माधव वायचाळ, व्ही.डी. देशमुख, गौतम खडसे, पंडित अवचार, माधव घ्यार, विष्णू क्षीरसागर, नागोराव गडदे, किशन घोलप, मारोतराव कोटकर, बालाजी जुनघरे, विजय राठोड, जेनारायण राठोड, गजानन पायघन, रमेश काळे, अशोक देशमुख, ज्ञानबा मुसळे, रामभाऊ खिल्लारी, उत्तम वानखेडे आदींनी या निर्णयाचे स्वागत केले.