शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पीडब्ल्यूडीने विभागात नेमले अभियंते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:59 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सात विभाग कार्यकारी अभियंत्यांविना वाऱ्यावर असल्यासारखे होते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सात विभाग कार्यकारी अभियंत्यांविना वाऱ्यावर असल्यासारखे होते. त्या सर्व विभागांना कार्यकारी अभियंते नियुक्त करण्यासाठी शासनाने मराठवाड्यासह राज्यात १८ अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हा परिषदेतील अभियंते विभागाने बदलले असून, तेथील जागा सध्या तरी रिक्त आहेत. यामुळे कहीं खुशी तर कहीं गम, अशी परिस्थिती विभागात निर्माण झाली आहे. ४ जुलैच्या अंकात लोकमतने ‘मराठवाड्यात पीडब्ल्यूडी वाऱ्यावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून बांधकाम खात्याला जागे केले. त्याचा परिणाम दोन दिवसांपूर्वी विभागात थोड्याफार प्रमाणात अभियंते नेमण्याची तसदी विभागाने घेतली. बदल्यांपूर्वी प्रभारी अभियंत्यांवर मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आल्यामुळे नवीन कामांना मुहूर्त लागत नव्हता, तर जुन्या कामांची बिले निकाली निघत नसल्यामुळे सगळी यंत्रणा कोलमडल्यासारखी झाल्याने मुख्य अभियंत्यांपासून सचिव, बांधकाममंत्र्यांपर्यंत तक्रारी गेल्या होत्या. एवढे होऊनही विभागातील जालना, हिंगोली जि.प.मधील रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. तसेच अंबाजोगाई, लातूरमध्येही कार्यकारी अभियंते नियुक्त करण्यात आले नाहीत. अहमदनगर, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, भंडारा, वाशिम आदी जिल्ह्यांतही बदल्या करण्यात आल्या. औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद मुख्य सर्कलअंतर्गत २७ कार्यकारी अभियंत्यांची पदे आहेत. यामध्ये तीन अधीक्षक अभियंता आणि एक दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचा समावेश आहे. विभागात तीन सा.बां.च्या तीन प्रयोगशाळा आहेत. औरंगाबादसह जालना जिल्ह्याचे एक सर्कल असून, यात ५ अभियंते औरंगाबादला, तर ३ जालन्यासाठी आहेत. नांदेडसह परभणी, हिंगोली, भोकर, नांदेड मार्ग प्रकल्प, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, हिंगोली, परभणी जि.प., उस्मानाबादमध्ये सर्कलसह लातूर, निलंगा, अंबाजोगाई, बीड, उस्मानाबाद, लातूर व उस्मानाबाद जि.प., बीड जि.प. सेक्शनचा समावेश आहे.