शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या घोळामुळे प्रवेशप्रक्रिया टांगणीला

By | Updated: December 3, 2020 04:10 IST

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यंदा अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनसह सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. यंदा कोरोनामुळे ...

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यंदा अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनसह सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासह अन्य सर्वच अभ्यासक्रमांवर परिणाम झाला आहे. ‘सीईटी’ परीक्षाही उशिरा झाली. दुसरीकडे, कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न होत असताना मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तथापि, तंत्रनिकेतन, आयटीआय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी सप्टेंबरमध्येच ‘एसईबीसी’ प्रवर्गातून प्रवेश अर्ज केले होते. आता त्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करुन खुल्या किंवा आर्थिक मागास प्रवर्ग, असे नमूद करण्याची भूमिका संबंधित प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत पडले आहेत.

‘सीईटी’चा निकाल जाहीर होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटला, तरी अद्याप राज्य प्रवेशपूर्व परीक्षाने अभियांत्रिकी प्रवेशाची अधिसूचना अद्याप जाहीर केलेली नाही. याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. प्रवेशाची अधिसूचना का जारी झालेली नाही, याबाबत तंत्रशिक्षण संचालनालय किंवा राज्य प्रवेशपूर्व कक्षाकडून मौन बाळगण्यात आले आहे.

यासंदर्भात तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर म्हणाले की, अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत दोन दिवसांत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. आम्ही पण, अधिसूचनेची वाट बघत आहोत. ‘सीईटी’चा निकाल लागल्यानंतर चौथा शनिवार, रविवार, सोमवारी गुरुनानक जयंती व आज मंगळवारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक अशा सलग चार दिवस सुट्या आल्या. कदाचित उद्या किंवा परवा अधिसूचना निघू शकते. यावेळी अभियांत्रिकी प्रवेशाच्या दोन फेऱ्या होतील. तिसरी समुपदेशन फेरी राहील.

चौकट....

तंत्रनिकेतन प्रवेशासाठी ५ डिसेंबरपर्यंत अर्जात दुरुस्तीची मुदत

सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रासाठी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी सप्टेंबर महिन्यात प्रवेश अर्ज भरले आहेत. ज्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्ग नमूद केला आहे. त्या विद्यार्थांना आपल्या अर्जात खुला किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद करावा लागणार आहे. यासाठी ५ डिसेंबरपर्यंत अर्जात दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली आहे.