शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:34 IST

राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. शासकीय कामासाठी कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पैठण, खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, कन्नड येथील तहसील, पंचायत समिती कार्यालयात प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. शासकीय कामासाठी कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पैठण, खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, कन्नड येथील तहसील, पंचायत समिती कार्यालयात प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते.सिल्लोड येथे शुकशुकाटसिल्लोड येथील अनेक कार्यालयात शुकशुकाट होता. तालुक्यात महसूल, पंचायत समिती कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाळा, बांधकाम विभाग, सिंचन विभागाचे बहुतेक कर्मचारी संपात सहभागी झाल्याने नागरिकांचे हाल झाले. सिल्लोड तहसीलमध्ये मंगळवारी सर्वत्र शुकशुकाट होता. उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील, पंचायत समिती, नगर परिषद कार्यालयात केवळ कार्यालयीन प्रमुखांशिवाय कुणीही नव्हते. कार्यालये, शाळा -महाविद्यालयातील कर्मचाºयांनी कार्यालयासमोरील मैदानात ठिय्या मांडला होता. शिक्षकेतर कर्मचाºयांच्या या संपात शिक्षक व प्राध्यापकांनी देखील काळ्या फिती लावून काम करून पाठिंबा दर्शविला. जुक्टा, मुक्टा व खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेतील खाजगी शिक्षण संघटना तसेच उर्दू शिक्षक संघटना अशा अनेक संघटनांनी व कर्मचाºयांनी या संपास पाठिंबा दिल्याने परिणाम झाला.फुलंब्रीत काम बंद आंदोलनफुलंब्री : तालुक्यातील कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. हे आंदोलन तीन दिवस चालणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या बंदमध्ये तहसील, पंचायत समिती, सहायक निबंधक सहकार, रजिस्ट्री कार्यालय तसेच कृषी विभागाच्या काही कर्मचाºयांनी सहभाग घेतला आहे. मंगळवारी तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर कर्मचाºयांनी घोषणाबाजी केली. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला.पैठणमध्ये बाजारपेठेवर परिणाम; न.प. कर्मचाºयांचा पाठिंबापैठण : तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे शहरातील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. दुसरीकडे पैठण नगर परिषद कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून संपाला आपला पाठिंबा दर्शविला. ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामस्थ, संप असल्याने कुठल्याही शासकीय कार्यालयात फिरकले नाही. परिणामी या संपामुळे पैठण शहर बाजारपेठेवर चांगलाच परिणाम झाला.सकाळी पैठण पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत आपल्या विविध मागण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. एरव्ही कार्यालयाला दांडी मारणाºया कर्मचाºयांसह सर्व कर्मचारी संपानिमित्त कार्यालय परिसरात दिसून आले.च्राज्य शासनाने आमच्या मागण्या तात्काळ सोडवाव्यात नसता यापेक्षा अधिक मोठे अंदोलन करू, असा इशारा कर्मचाºयांनी दिला. यावेळी सतीश आखेगावकर, राजेश कांबळे, शेख अन्वर, गंगाधर यलवार, विजय ढाकरे, दीपक गावंडे, शैलेश चौधरी, संजय सोनवणे, मोहन गाभूड, सुभाष दळे, सागर डोईफोडे, संजय पवार, दशरथ खराद, फकीरा मुंडे, विष्णू भंडारे, सखाराम दिवटे, सुभाष चौधरी आदी कर्मचाºयांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.खुलताबादेत पं.स. समोर धरणे आंदोलनखुलताबाद : खुलताबादच्या अनेक कार्यालयात शुकशुकाट होता. खुलताबाद पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाºयांनी सकाळीच कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आपल्या विविध मागण्यांविषयी घोषणा दिल्या. कामबंद आंदोलन असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या लोकांची कामे खोळंबली होती.तहसील कार्यालयात शुकशुकाट बघावयास मिळाला. नगर परिषदेतील कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून कार्यालयीन कामकाज करून आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाºयांना दिले.

टॅग्स :Morchaमोर्चाGovernment Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप