शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठावर प्रशासनाचा ‘वॉच’

By admin | Updated: August 5, 2016 00:10 IST

जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो.

जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो. पूर परिस्थितीसह इतर आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. तालुका निहायही समिती स्थापन असून, जिल्हा कक्ष चोवीस सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. काही धोका होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासनानेही नियोजन केले आहे. जिल्ह्यास साठ किलोमीटरचा गोदाकाठ लाभला आहे. अंबड तालुक्यातील १३ गावे गोदाकाठावर वसलेली आहेत. यात प्रामुख्याने गोंदी, गांधारी, वाळकेश्वर, कुरण, गंगा चिंचोली, साष्टपिंपळगाव, बळेगाव, अपेगाव, शहागड, पाथरवाला बुद्रूक, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगावचा समावेश आहे.सध्यस्थितीत पुराचा धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. २००६ मध्ये वरील गावांत पुराचे पाणी शिरल्याने मोठी धावपळ उडून जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदा तशी स्थिती नसली तर प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. अंबड तालुक्यासोबतच भोकरदन तालुक्यातील धामणा, केळणा, रायघोळ नद्या वाहतात. यामुळे शेलूद, पारध व भोकरदन शहरातील झोपडपट्टी भाग पूरप्रवण क्षेत्रात येतो. येथील प्रशासनाकडून पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केली आहे. जाफराबाद तालुक्यातील काळनदीमुळे कोनड, निमखेडा यांना पुराचा फटका बसू शकतो. परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकनपुरी, गंगाकिनारा, चांगतपुरी, सावरगाव बुद्रूक गोदावरीला विस्तीर्ण किनारा लाभला आहे. घनसावंगी तालुक्यातील भादली, सिरसवाडी, राजाटाकळी, मंगरूळ, मुद्रेगाव, रामसगाव, गुंज, बाणेगाव, सौंदलगाव, लिंगेवाडी, उक्कडगाव, जोगलादेवी, भोगाव, शेवता, कोठी, पांगरी या गावातून १७ गावांतून गोदावरी वाहते याभागाकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. (प्रतिनिधी) औरंगाबाद येथे असलेल्या भारतीय सैन्याच्या क्रमांक २३ व्या तुकडीने जालना जिल्हा दत्तक घेतला आहे. या तुकडीतील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पूर प्रवण गावांची पाहणी केली आहे. काही आपत्ती ओढावल्या सैन्य तुकडी तयार आहे. सातही दिवस चोवीस तास आपत्ती कक्ष सुरू राहणार असून, कक्षातील ०२४८२-२२३१३२ तसेच १०७७ टोल फ्री क्रमांक सुरू असल्याचे अधिकारी खान यांनी सांगितले.नदीपात्रात पाण्याची पातळी समजण्यासाठी धरणापासून ते शेवटपर्यंत खुणा करणे आवश्यक आहे. यात निळी खूण सर्वसाधारण पूर परिस्थिती तर लाल खूण ही धोक्याची सूचना देते. परंतु प्रशासनाकडून अशा खुणा करण्यात आलेल्या नाहीत.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. १०७७ हा टोल फ्री क्रमांक आहे. पूर परिस्थती झाल्यास दहा ते बारा नागरिक बसू शकतील अशा रबर बोट, हुड मास्क, हेल्मेटस, टेबल टॉवर, फोल्डेबल स्ट्रेचर, फायर सुट, फस्टऐड किट, आगरोधक यंत्र, लाईफ जॅकेटसचे वाटप करण्यात आले आहे.