शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST

औरंगाबाद: शहरात वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महापालिका करीत असलेल्या उपाययोजना आणि लसीकरणाची माहिती देण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी ...

औरंगाबाद: शहरात वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महापालिका करीत असलेल्या उपाययोजना आणि लसीकरणाची माहिती देण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे पालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी प्रशासन तयार असल्याचा दावा प्रशासकांनी केला.

माजी महापौर नंदकुमार घोडले, राजेंद जंजाळ, विकास जैन, गजानन बारवाल, राजू शिंदे, प्रमोद राठोड, विजय औताडे, भाऊसाहेब जगताप, मनोज गांगवे, जयश्री कुलकर्णी, गंगाधर ढगे आदींनी यात सहभाग नोंदविला.

पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी या बैठकीत सूचना केल्या. वॉररूम रुग्णवाहिका व्यवस्थापन, बेड मॅनेजमेंट, हॉस्पिटल डिस्चार्ज मॅनेजमेंट आणि मनपा अ‍ॅपच्या माध्यमातून बेडची उपलब्धता करून देण्यात येत असल्याचे प्रशासकांनाी सांगितले. तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन आता तयार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये दोन ऑक्सिजन प्लांट उभारणीचा निर्णय घेतला आहे. उद्योजकांनी सहकार्य करण्यास सुरू केले आहे. लसीकरणाबाबत नागरिकांत असलेली भीती आता दूर होत असून लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. शहरात २ लाख ४४ हजार नागरिकांना लस दिली आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असून कोरोनापासून मुक्त होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. सध्या लस कमी पडत असून लस लवकरच उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

मनपा पदाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

मनपाच्या माजी पदाधिकाऱ्यांनी सूचना करताना, खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरसह सर्व प्रकारचे बेड्स व लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, रेमडेसिविर खरेदी करा, गॅस शवदाहिनी लवकर सुरू करा, शासकीय योजनांचे फलक प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावावेत, अशा सूचना केल्या. तसेच मेल्ट्रॉनच्या महिला डॉक्टरांना रुग्णांशी नम्रतेने बोलण्यास सांगावे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची शक्यता असल्याने अधिक सजग राहण्याची सूचना माजी पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.