शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य समितीच्या तयारीत जुंपले प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:22 IST

राष्ट्रीय आरोग्य समिती ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौºयावर येत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन स्वच्छतेसह दस्ताऐवजांची जुळवाजुळव करण्यात दंग झाल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय आरोग्य समिती ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौºयावर येत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन स्वच्छतेसह दस्ताऐवजांची जुळवाजुळव करण्यात दंग झाल्याचे दिसून येत आहे.केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी राज्यातील दोन जिल्ह्यांतील आरोग्य सेवेचा आढावा घेतला जातो. यावर्षी ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य समिती राज्यातील वर्धा व परभणी या दोन जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेणार आहे. ही समिती जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालयांची तपासणी करणार आहे. या तपासणीमध्ये प्रामुख्याने रुग्णालय व परिसरातील स्वच्छता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणारी जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, कुटुंब कल्याण, बालकांचे लसीकरण, गरोदर मातांची तपासणी, संसर्जन्य आजार, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब या योजनेत देण्यात आलेले उद्दिष्ट, झालेले काम, रुग्णांचे समाधान, १०२, १०८ या सेवांचा आढावा यासह विविध कार्यक्रम, उपक्रम गरजूपर्यंत पोहचतात की नाही, आदी बाबींचा आढावा घेणार आहे. त्यामुळे या समितीने जिल्ह्यातील आरोग्य सेवेबद्दल नाराजी व्यक्त करु नये, यासाठी गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन व आरोग्य विभाग कामाला लागला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसह परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक वार्डातील स्वच्छता, जुन्या इमारतींची रंगरंगोटी, मानसिक आजार, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, रक्तदान आदी योजनांच्या माहिती संदर्भातील पोस्टर्स रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयातील दस्ताऐवज अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रुग्णालय प्रशासनाने दोन दिवस रुग्णालयातील वॉर्ड पाण्याने स्वच्छ केले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन आरोग्य समितीच्या दौºयाचा धसका घेऊन स्वच्छतेसह दस्ताऐवजांची जुळवाजुळव करण्यात जुंपल्याचे दिसून येत आहे.