औरंगाबाद : मराठवाडा विभागीय आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आठ जिल्ह्यांत लातूर, उस्मानाबाद आणि काही प्रमाणात नांदेड जिल्हा प्रशासन सक्षमपणे नागरिकांसाठी यंदा दिलासादायी काम करीत असल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी व्यक्त केले. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. विभागात मागील चार वर्षांपासून सतत दुष्काळ पडतो आहे. दुष्काळात बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यांनी सर्वाधिक झळा सोसल्या. जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील दुष्काळामुळे जलयुक्त शिवार योजनेसह इतर टंचाईच्या कामांचा राबता होता. परंतु या जिल्ह्यांत काही ठिकाणी जलयुक्त शिवाराची कामे पावसाळा सुरू झाला तरीही पूर्ण झालेली नाहीत. जलयुक्त शिवार योजनेमध्ये औरंगाबाद शहर मागे आहे, तर बीड जिल्हा प्रशासनाने चारा छावण्या बंद करण्याप्रकरणी मध्यंतरी शासनाला अहवाल दिला होता. त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. बीड, लातूर, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांचा आकडा ३७६ पर्यंत गेला होता, तर सर्वाधिक टँकर बीडमध्ये सुरू होते. दुष्काळात सर्वाधिक पाणीटंचाई लातूर शहरात निर्माण झाली होती. रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय यावर्षीच्या दुष्काळात झाला होता. लातूर शहरात जिल्हा प्रशासनाला पाणीपुरवठ्यासाठी प्रचंड कसरत करावी लागली. जलयुक्त शिवार योजनेत लातूरमध्ये चांगले काम झाल्यामुळे जून महिन्यातील पावसातच त्याचा लाभ पाहावयास मिळाला आहेत. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेतील १६८२ पैकी अंदाजे ३५० गावांत कामे पूर्ण झाल्याचे दिसते. १३३२ गावांत आता कामे आता होतील अशी शक्यता नाही. ४गेल्या वर्षी जलयुक्त शिवारसाठी १६८२ गावे निवडण्यात आली होती. पावसाळा सुरू झाल्याने जास्तीची कामे होतील अशी शक्यता नाही.
जिल्ह्यांत प्रशासन सक्षम
By admin | Updated: June 29, 2016 01:00 IST