शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनच बनले शुक्राचार्य

By admin | Updated: October 5, 2016 01:12 IST

कन्नड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०११-१२ व २०१२-१३ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांची प्रलंबित देयके एक महिन्यात निकाली काढावीत

कन्नड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०११-१२ व २०१२-१३ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांची प्रलंबित देयके एक महिन्यात निकाली काढावीत असे स्पष्ट निर्देश देऊनही अद्यापपर्यंत तसे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत दाखलच झालेले नाहीत अशी धक्कादायक माहीती समोर आली आहे.सन २०१६ च्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत जवखेडा बु. (ता.कन्नड) येथे २६२ मजुरांच्या पाझर तलावाच्या कामाची मजुरी देण्याबाबत प्रश्न क्र. २२१६१ उपस्थित झाला होता. या प्रश्नावर रोहयो मंत्री यांच्याकडे दि. १७ जुलै रोजी बैठकीत चर्चा झाली. जवखेडा बु.सह संपूर्ण जिल्ह्यातील सन २०१२-१३ व त्यापुर्वीच्या प्रलंबित मजुरी देयकाबाबतचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांनी १० दिवसात निकाली काढून आयुक्त (नरेगा) नागपूर यांच्याकडे सादर करावे, प्रस्ताव प्राप्त होताच दोन दिवसाच्या आत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रलंबित मजुरी देयकांचे प्रदान करावे, मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी संयुक्त स्वाक्षरीने विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव तात्काळ सादर करावे, विभागीय आयुक्त यांनी १ महिन्यात प्रस्ताव निकाली काढावे, अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या होत्या. या सुचना देणारे पत्र २७ जुलै २०१६ रोजी काढण्यात आले होते. पंचायत समितीला हे पत्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाले. मात्र पावणेदोन महिने उलटले तरीही पंचायत समितीने प्रलंबित देयकाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल केलेले नाहीत.